Agriculture news in marathi Cheating in onion seeds; Neglected by the Department of Agriculture | Page 2 ||| Agrowon

कांदा बियाण्यांत फसवणूक; कृषी विभाग ढीम्म

टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 एप्रिल 2021

बियाणांत फसवणूक झाल्याचा प्रकार नगर जिल्ह्यातील नगर, नेवासा, राहुरी, पारनेर तालुक्यांत उघड झाला. फसवणुकीतून लाखो रुपयांचे नुकसान झालेले शेतकरी नगर जिल्ह्यात कृषी विभागाकडून मात्र दुर्लक्षित झाले असल्याचे दिसून येत आहे.

नगर ः रब्बीत कांदा लागवड करण्यासाठी यंदा गावराण कांद्याचे बियाणे नेहमीच्या तुलनेत दुप्पट दराने खरेदी केले खरे, मात्र पीक हाती आल्यानंतर संबंधित बियाणांत फसवणूक झाल्याचा प्रकार नगर जिल्ह्यातील नगर, नेवासा, राहुरी, पारनेर तालुक्यांत उघड झाला. फसवणुकीतून लाखो रुपयांचे नुकसान झालेले शेतकरी नगर जिल्ह्यात कृषी विभागाकडून मात्र दुर्लक्षित झाले असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीही अकोले तालुक्यात बटाट्याच्या बियाणांत तसेच खरिपात सोयाबीन, बाजरीसह अन्य बियाण्यांत फसवणूक झाली. त्याबाबतही कृषी विभागाने दखल घेतली नसल्याने शेतकरी भरपाईपासून वंचित राहिले. 

नगर जिल्ह्यात यंदा कांद्याची दरवर्षीपेक्षा सुमारे पन्नास हजार हेक्टरवर अधिक लागवड झाली. अगदी रब्बीत कांदा लागवडीवेळी गावराण कांदा बियाण्यांची दुप्पट दराने खरेदी केली. मात्र आता ते बियाणे बोगस असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मोठा आर्थिक फटका सोसूनही कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कसलाही आधार मिळेना झाला. कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणीही करत नाहीत. कारवाईचा अधिकार कृषी विभागाला नाही. मात्र बोगस कांदा बियाणे विक्री होऊ नये यासाठी त्या वेळी काय केले? किती दुकानदारांवर कारवाई केली? याचे उत्तर मात्र कृषी विभागाकडे नाही. कृषी अधिकाऱ्यांच्या बेफिकिरीचा कांदा उत्पादकांना मात्र मनस्ताप सोसाला लागत आहे. 

दुकानदार म्हणतात, आम्ही केले सगळेच मॅनेज 
कांदा बियाणे खरेदी करताना बियाणे विक्रेते चांगले बियाणे म्हणून दुप्पट दराने विकले. आता मात्र बियाणे कंपनी, विक्रेते दुकानदार काहीच बोलू देत नाहीत. सुरुवातीला बियाणे कंपन्यांनी थोडीफार रक्कम देऊ केली होती. आतामात्र तीही द्यायला तयार नाहीत. ‘‘तुम्ही जा न्यायालयात, माध्यमात बातम्या छापा, आम्ही कृषी विभागापासून बाजार समितीपर्यंत सगळे मॅनेज केले आहेत. त्यामुळे काही होत नाही. फारच आरडाओरड झाली, तर पुढच्या वर्षी बियाण्यांचे नाव बदलू.’’ असे बियाणे विक्रेते आणि बियाणे उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी सांगत असल्याचे एका शेतकऱ्याने ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले. जिल्ह्यातील नेते, मंत्र्यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांनी न्याय देण्याची भूमिका ठेवावी, असेही तो शेतकरी म्हणाला. 

शेतकऱ्यांनी जावे न्यायालयात.... 
कांदा अथवा अन्य कोणत्याही बियाण्यांत फसवणूक झाली, तर त्याबाबत संबंधित शेतकऱ्यांने कृषी विभागाकडे तक्रार करायची. त्यानंतर तालुका पातळीवरील तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेली तक्रार निवारण समिती प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करते आणि वस्तुस्थितीचा अहवाल सबंधित शेतकऱ्यांकडे दिला जातो. त्यानंतर झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवायची असेल, तर शेतकऱ्यांनी स्वतःच न्यायालयात, ग्राहक मंचात जायचे आहे. तसा सल्लाही कृषीचे अधिकारी देतात. मात्र बोगस बियाण्यांची विक्री होऊ नये म्हणून कृषी विभागाकडून काहीही कारवाई होत नसल्याचे आतापर्यंत नगर जिल्ह्यात दिसून आले आहे. 

कांदा लगेच विकायला लागतोय 
नगरमध्ये रब्बीत गावरान कांद्याची लागवड होत असते. यंदाही दुप्पट दराने खरेदी करून गावरान कांदा म्हणूनच लागवड केली होती. मात्र कांदा पांढरा तसेच पावसाळी लाल नाशिक कांद्याचे बियाणे विक्रेत्यांनी गावरान म्हणून विकल्याचे स्पष्ट झाले आहे. आता काढलेला कांदा फार दिवस टिकाणारा नाही. तो पंधरा दिवसांत खराब होत आहे. त्यामुळे यंदा कांदा उत्पादकांना मोठा मनस्ताप आणि आर्थिक फटका सोसाला लागत आहे. त्याबाबत कोणी दखल घेईल का, असा प्रश्‍न कांदा उत्पादक शेतकरी सुनील मते यांनी सांगितले. 
 


इतर ताज्या घडामोडी
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...
धान चुकाऱ्याअभावी शेतकऱ्यांची आर्थिक...गोंदिया : गेल्यावर्षी आधारभूत दराने धान विक्री...
सांगलीत खरिपासाठी हवे ३३ हजार ६९०...सांगली  : यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कृषी...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
तुलनेत यंदा दुपटीने गाळपकोल्हापूर : गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, कांदा, फळ...जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीत...
अस्वलाकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी...भंडारा : जंगलालगत असलेल्या शेतीत वन्यप्राण्यांचा...
अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, ‘...मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर...
अति उष्ण, ढगाळ हवामानआठवडा अखेरपर्यंत ते १००६ हेप्टापास्कल इतके राहतील...
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे...पुणे ः बहुप्रतीक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड...
नाशिक : माथाडी युनियनकडून ‘काम बंद’नाशिक : राज्य शासनाच्या विविध माथाडी मंडळातील...
पुणे ‘जि.प.’तर्फे कर्मचाऱ्यांना मिळणार...पुणे ः ‘‘जिल्हा परिषदेच्या बक्षिस योजनेतून आता...
‘खरिपात सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरा’सातारा : येत्या खरीप हंगामात  सोयाबीनचे...