Agriculture news in marathi Check bill, micro finance companies transactions: kadu | Agrowon

हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स कंपन्यांचे व्यवहार तपासा ः पालकमंत्री कडू

टीम अॅग्रोवन
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांमार्फत देण्यात येणारे कर्ज व त्याची होणारी नियमबाह्य अव्वाच्या सव्वा वसुलीबाबत अनेक तक्रारी आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने हुंडी चिठ्ठी व मायक्रो फायनान्स कंपन्यांचे व्यवहार तपासावेत, असे निर्देश राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी येथे दिले.

अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांमार्फत देण्यात येणारे कर्ज व त्याची होणारी नियमबाह्य अव्वाच्या सव्वा वसुलीबाबत अनेक तक्रारी आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने हुंडी चिठ्ठी व मायक्रो फायनान्स कंपन्यांचे व्यवहार तपासावेत, असे निर्देश राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी येथे दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक आलोक तारेनिया तसेच अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.

या वेळी शेतकऱ्यांना हुंडीचिठ्ठीद्वारे कर्ज देऊन त्याची अव्वाच्या सव्वा वसुली केली जात असल्याच्या तक्रारी निदर्शनास आल्या आहेत. याबाबत जिल्हा उपनिबंधकांनी अहवाल सादर केला. त्यावर कडू यांनी निर्देश देत, तक्रारींच्या अनुषंगाने कारवाई करताना झालेल्या व्यवहाराच्या अनुषंगाने जमीन व अन्य प्रकारची काही खरेदीचे व्यवहार झाले असल्यास त्याचीही तपासणी करावी. तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांचे व्यवहारही तपासावेत.  प्राप्त तक्रारींच्या कारवाईचा अहवालही सादर करावा, असेही निर्देश दिले.

सिंचन प्रकल्पांचा आढावा 
पूर्णा बॅरेज-२ (नेरधामणा) मध्यम प्रकल्प ता. तेल्हारा, उमा बॅरेज मध्यम प्रकल्प (ता.मूर्तिजापूर), घुंगशी बॅरेज मध्यम प्रकल्प (ता. मूर्तिजापूर),काटेपूर्णा बॅरेज प्रकल्प, कवठा बॅरेज प्रकल्प (ता. बाळापूर), शहापूर बृहत लघू प्रकल्प (ता. अकोट) या अपूर्ण प्रकल्पांपैकी लवकर पूर्ण होऊ शकणाऱ्या प्रकल्पांबाबत वरिष्ठ पातळीवर बैठकीचे नियोजन करण्याच्या सूचना श्री. कडू यांनी  दिल्या.‍


इतर ताज्या घडामोडी
पुणे बाजार समितीत व्यवहार सुरळीत...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बुलडाण्यात २८२ शेतकऱ्यांनी राबवला रेशीम...बुलडाणा : जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून सहकार व...
पुणे विभागात खरीप पेरणीत अडीच लाख...पुणे ः यंदा जूनच्या सुरुवातीला पावसाने चांगली...
बिबट्याच्या पिंजऱ्यांशेजारीच बसून करणार...मंचर : वनखात्यानेही बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी...
खरीप पीक कर्जासाठी भाजपचा आज ठिय्याअमरावती : खरीप हंगाम अर्ध्यावर आला असतानासुद्धा...
औरंगाबादेत ग्राहकांचा रानभाज्या खरेदीला...औरंगाबाद ः आरोग्यदायी व अनेक औषधी गुणधर्म...
नगर जिल्ह्यात तुरीचा ५४ हजार हेक्टरवर...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला...
रत्नागिरी जिल्ह्यातील ६५ पैकी ४८ धरणे...रत्नागिरी ः अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी...
सांगलीत अडीच हजार क्विंटल मक्याची खरेदीसांगली ः जिल्ह्यातील तीन हमीभाव केंद्रांच्या...
निकृष्ट बियाणे पुरवठादार कंपन्यांवर...अमरावती: निकृष्ट दर्जाच्या बियाणे पुरवठा प्रकरणात...
मराठवाडा विभागातील हवामानानुसार पीक...मराठवाडा विभागातील एकूण हवामान, पर्जन्यमान या...
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...