उगवणशक्ती तपासून बियाणे निवडा ः डॉ. देवसरकर

बियाण्याची निवड करताना चांगल्या जाती, बियाण्यांची उगवणशक्ती तपासणे, बीजप्रक्रिया, खताचे नियोजन, कीड व रोग व्यवस्थापन तसेच अधिक उत्पादन महत्त्वाचे असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष ‘वनामकृवि’चे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांनी सांगितले.
Check the germination and select the seeds: Dr. Devasarkar
Check the germination and select the seeds: Dr. Devasarkar

जालना : बियाण्याची निवड करताना चांगल्या जाती, बियाण्यांची उगवणशक्ती तपासणे, बीजप्रक्रिया, खताचे नियोजन, कीड व रोग व्यवस्थापन तसेच अधिक उत्पादन महत्त्वाचे असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष ‘वनामकृवि’चे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर यांनी सांगितले.

रब्बी हंगामाला आता सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना त्याविषयी अधिकाधिक तांत्रिक माहिती मिळावी या हेतूने शेतकऱ्यांसाठी कृषी विज्ञान केंद्र बदनापूरच्या वतीने नुकतेच सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्या सप्ताहाच्या उद्‌घाटनप्रसंगी डॉ. देवसरकर बोलत होते. ऑनलाइन वेबिनारच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या विविध समस्यांवर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक केव्हीकेचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिनकुमार सोमवंशी यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषय विशेषज्ञ, कृषिविद्या डॉ. दीपाली कांबळे यांनी केले. २६ ऑक्टोबरला सप्ताहाच्या प्रथम सत्रात पूर्वहंगामी ऊस लागवड तंत्रज्ञानाविषयी मृदा परीक्षक आणि प्रभारी अधिकारी, जिल्हा विस्तार केंद्र व मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, साताराचे डॉ. सुभाष घोडके यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

त्याच दिवशी दुपारच्या सत्रात गहू लागवड तंत्रज्ञान या विषयी गहू विशेषज्ञ, कृषी संशोधन केंद्र, निफाडचे डॉ. सुरेश दोडके यांनी सखोल मार्गदर्शन केले. गहू लागवड वेळेवर करावी, असे त्यांनी सुचविले. सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी २७ ऑक्टोबरला पहिल्या सत्रात जवस कृषी विद्यावेत्ता, अखिल भारतीय समन्वित जवस व मोहरी संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय नागपूर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे डॉ. जीवन कतोरे यांनी जवस पिकाचे महत्त्व विषद केले.

द्वितीय सत्रात मका पैदासकार, प्रमुख शास्त्रज्ञ, भारतीय अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे डॉ. साई दास यांनी मका पीक लागवड तंत्रज्ञान, तसेच बीजोत्पादनमधील संधी आणि आव्हाने याविषयी सखोल चर्चा केली. सद्यःस्थितीत शेतकऱ्यांनी एकात्मिक पद्धतीने गहू पिकातील रोग व्यवस्थापन करा, असे गहू रोग शास्त्रज्ञ, निफाड कृषी संशोधन केंद्राचे डॉ. बी. पी. गमे यांनी निवेदन केले. प्रभारी अधिकारी, करडई संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे डॉ. एस. बी. घुगे यांनी करडई लागवड तंत्रज्ञान याविषयी दुपारच्या सत्रात शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक केली. अखेरच्या दिवशी करडई पिकातील-एकात्मिक रोगनियंत्रण या विषयावर करडई रोग शास्त्रज्ञ डॉ. संतोष पवार यांनी मार्गदर्शन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com