Agriculture news in Marathi Check water sources in rural areas: MP Rana | Agrowon

ग्रामीण भागातील पाण्याचे स्त्रोत तपासा ः खासदार राणा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

अमरावती ः ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसात पाणीप्रश्‍न गंभीर होतो. त्याची दखल घेत उपलब्ध पाण्याचे स्त्रोत आणि नमुने तपासण्यात यावे, अशी सूचना खासदार नवनीत राणा यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना पत्राव्दारे केली आहे.

अमरावती ः ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसात पाणीप्रश्‍न गंभीर होतो. त्याची दखल घेत उपलब्ध पाण्याचे स्त्रोत आणि नमुने तपासण्यात यावे, अशी सूचना खासदार नवनीत राणा यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना पत्राव्दारे केली आहे.

आदिवासीबहूल चिखलदरा, धारणी परिसरात उन्हाळ्याच्या दिवसात पाणीप्रश्‍न गंभीर होतो. नागरिकांवर भटकंतीची वेळ येते. दर्यापूर तालुक्‍यातील सासन, रामापूर, सामदा, करतखेडा, सांगळूद या गावासह अंजनगावसूर्जी तालुक्‍यातील भातकुली, आसरा, नांदेड, ऋणमोचन, भानखेडा, गोविंदपूर मोगरा, मार्डी, कापूसतळणी, वडणेरगंगाई या गावांमध्ये देखील पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. यातील बहुतांश गावे खारपाणपट्टयात आहेत.

त्यामुळे शासकीय पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यावरच त्यांना अवलंबून राहावे लागते. काही गावातील नळ योजनांना चार ते पाच दिवसानंतर पाणी येते. हे पाणी सुरुवातीला गढूळ येत असल्याने नागरिकांमध्ये हे पाणी पिण्यायोग्य की अयोग्य याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. उन्हाळ्याचे दिवस त्यातच लॉकडाऊन यामुळे नागरिकांची चिंता आणखीच वाढली आहे. याची दखल घेत या पाण्याचे स्त्रोत आणि नमुने प्रयोगशाळेच्या माध्यमातून तपासण्यात यावे, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

खासदार राणा यांच्या पत्रातील मुद्दे

  • ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना वेळीच पूर्ण करा.
  • पाण्याचे नमुने प्रयोगशाळेतून तपासा.
  • पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा अखंडीत ठेवा.
  • धारणी, चिखलदरा भागात टॅंकरने पाणीपुरवठा करा.

इतर ताज्या घडामोडी
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री...मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते...
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८०...मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे...
परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा...अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून...
लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः...भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट...
गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी...यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ...
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची...
टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला...भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड...
शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर...पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे...
नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला...अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती,...
‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला...नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे...
नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंडनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह...
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात...नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
दोन वाहनांतील कापूस घेण्याचे आदेश द्या...परभणी : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मानवत...
दुग्ध व्यवसायाने घराला आधारशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच...
पंतप्रधान मोदी यांच्याकडून संशोधक...नाशिक : जिल्ह्यातील वऱ्हाणे (ता.बागलाण) येथील...
ग्रामविकास विभागामार्फत मोफत आर्सेनिक...कोल्हापूर  : नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती...
कापसाच्या वाती करून शासनाची आरती...अमरावती  ः पूर्व विदर्भातील पांढऱ्या...
एचटीबीटीबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा...नागपूर  ः एचटीबीटीचा विषय केंद्र सरकारच्या...