agriculture news in Marathi chemical fertilizers rate increased Maharashtra | Agrowon

रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ 

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 मे 2021

केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ करण्यास मान्यता दिली नसल्याचे स्पष्ट केलेले असतानाही खत कंपन्यांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी दरवाढ लागू केली आहे.

पुणे ः केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ करण्यास मान्यता दिली नसल्याचे स्पष्ट केलेले असतानाही खत कंपन्यांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी दरवाढ लागू केली आहे. कोरोना, लॉकडाउनमुळे शेतीमाल विक्री व्यवस्था कोसळून पडलेली असताना काही ग्रेडमध्ये गोणीमागे ५०० ते ७०० रुपये इतकी मोठी दरवाढ केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. मात्र जागतिक बाजारात कच्चा माल महागल्याने खतांच्या ‘एमआरपी’त वाढ करणे अपरिहार्य असल्याचा दावा खत उद्योगाने केला आहे. 

खतांच्या किमती वाढविण्याबाबत प्रत्येक कंपनीच्या व्यवस्थापन वर्तुळात जानेवारीपासून जोरदार हालचाली सुरू होत्या. ‘अग्रोवन’ने मात्र ‘खते दरवाढीची शक्यता’ या मथळ्याखाली १० मार्चला बातमी प्रसिद्ध करून दरवाढीबाबत स्पष्ट संकेत दिले होते. मार्चमध्येच काही कंपन्यांनी दरवाढ केली होती. इफ्कोने देखील नजीकच्या वाढीव दरांचा अंदाज घेतला होता. तसेच, सुधारित दराबाबत माहिती देणारे एक कार्यालयीन पत्र आपल्या प्रकल्पांना पाठविले होते. या पत्रातील माहिती जाहीर झाल्यानंतर दरवाढ लागू झाली नसून तो अंतर्गत पत्रव्यवहार होता, अशी भूमिका इफ्कोने घेतली. 

केंद्राचा आधार फसवा निघाला 
गेल्या महिन्यात काही राज्यांमध्ये निवडणुका सुरू असताना काही खत उत्पादक कंपन्यांनी दरवाढ केल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. त्यामुळे केंद्रीय रसायने व खते विभागाचे राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी धावपळ करीत खत उत्पादकांसोबत बैठक घेतली होती. ‘‘सध्याच्या स्थितीत कोणत्याही रासायनिक खताच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे,’’ असे मंडाविया यांनी घोषित करीत शेतकऱ्यांना आधार दिला होता. मात्र हा आधार आता फसवा निघाला. निवडणुका संपताच दरवाढ करा, अशी मुभा आतून केंद्राने दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. 

युरियाची किंमत स्थिर 
‘‘राज्यातील बहुतेक कंपन्यांनी आपपल्या वाढीव उत्पादन खर्चाचा अंदाज घेत खतांच्या किमती वाढविल्या आहेत. मात्र एकाही कंपनीने युरियाची किंमत वाढवलेली नाही. केंद्राचे निर्बंध असलेल्या युरियाची ५० किलोची गोणी अजूनही २६६ रुपये ५० पैसे दरानेच विकली जात आहे. युरिया वगळता खताच्या इतर ग्रेडवर सरकारचे निर्बंध नाहीत. वाढीव किमतीबाबत राज्याचे कृषी खाते कोणतेही कारवाई करू शकत नाही. ही बाब पूर्णतः केंद्र सरकार व खत कंपन्यांच्या अंतर्गत धोरणांच्या अखत्यारित येते. आम्ही केवळ एमआरपीप्रमाणे आणि दर्जाप्रमाणे खत विकले जाते की नाही हे तपासण्यास बांधील आहोत,’’ अशी माहिती कृषी खात्याच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. 

आयुक्तांना साकडे 
‘‘खतांची दरवाढ होणार नसल्याचे सरकारने जाहीर केले आहे. मात्र बाजारात वाढीव दराने खत विक्री सुरू आहे. सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करून काही कंपन्या शेतकऱ्यांची घोर फसवणूक करीत आहे. केंद्र किंवा राज्य शासनही या मुद्द्याकडे लक्ष देत नाही. खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांमध्ये खतांच्या दराबाबत संभ्रम आहे. त्यामुळे शेतकरी खत घ्यायला तयार नाहीत. आयुक्तांनी आमच्यावर होणारा अन्याय दूर करावा,’’ अशी मागणी औरंगाबादच्या जय जवान जय किसान शेतकरी मंडळाने कृषी आयुक्तांकडे केली आहे. 

अशी झाली दरवाढ 

कंपनी आधीचे दर नवे दर 
डीएपी     
इफको १२०० १९००
कोरोमंडल १२५० १४५० 
स्मार्टकेम १२५० २१०० 
जीएसएफसी १२०० १९०० 
आरसीएफ १३४० -
कृभको १२५० १९०० 
इंडियन पोटॅश १२२५ १९०० 
झुआरी/प्रदीप फॉस्फेट १२५५ १९०० 
एमओपी     
कोरोमंडल ९५० ८५० 
स्मार्टकेम ९५० -
जीएसएफसी ९५० ८७५ 
आरसीएफ ९७० ८५० 
कृभको ८७५ -
इंडियन पोटॅश ९५० १००० 
झुआरी/प्रदीप फॉस्फेट ९४९ १००० 
२०:२०:००:१३     
इफको ९७५ १३५० 
कोरोमंडल १००० १३०० 
स्मार्टकेम १०६५ १६०० 
जीएसएफसी ९७५ १३५० 
आरसीएफ ९७५ ११५० 
कृभको १००० -
इंडियन पोटॅश ९७५ १४०० 
झुआरी/प्रदीप फॉस्फेट १०१५ १४०० 
१०:२६:२६:००     
इफको ११७५ १७७५ 
कोरोमंडल ११८५ १३७५ 
स्मार्टकेम १२९५ १९२५ 
जीएसएफसी ११७५ १७७५ 
आरसीएफ १२७० -
कृभको १२०० १७७५ 
झुआरी/प्रदीप फॉस्फेट १२२५ १७७५ 
१२:३२:१६     
इफको ११८५ १८०० 
कोरोमंडल १२०० १२०० 
स्मार्टकेम १३०५ १९५० 
जीएसएफसी ११८५ १८०० 
आरसीएफ १२०० १२७० 
कृभको १२१० १८०० 
झुआरी/प्रदीप फॉस्फेट १२३५ १८०० 

(टीप ः आकडे रुपयांमध्ये असून ५० किलोच्या गोणीचे आहेत. बाजारात काही कंपन्यांनी अद्याप वाढीव दर जाहीर केलेले नाहीत. शेतकऱ्यांनी खात्री करण्यासाठी कृषी विभाग, खत कंपनीचे विक्रेते किंवा प्रतिनिधींशी संपर्क साधावा.) 


इतर बातम्या
तुरळक ठिकाणी मुसळधार शक्य पुणे : कोकणसह राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस...
कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला...
पेरणीची घाई नको : कृषी आयुक्तालयपुणेः राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर...
मॉन्सूनला पोषक वातावरण पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने प्रवास...
दूध दरातील कापतीने शेतकऱ्यांची परवड औरंगाबाद: महिनाभरातच दुधाच्या दरात तब्बल ११...
सातव्या वेतन आयोगासाठी महामंडळांमधील...नगर : राज्यातील विविध महामंडळांमधील अधिकारी-...
पीककर्ज व्याज सवलत योजनेचे पालकत्व...पुणेः शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने तीन...
राज्यातील प्रकल्पांमध्ये केवळ २१ टक्के...पुणे ः मे आणि जून महिन्यात पाण्याची मागणी...
कमी दराने कांदा खरेदी सुरूच नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रत्नागिरी, संगमेश्‍वर, राजापूरला ...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी...
दूध दरासाठी गुरुवारी आंदोलन नगर : लॉकडाउनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक...
चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना...वडाळी जि. अकोला : या हंगामाला सुरुवात होताच...
पशुचिकित्सा व्यावसायिक संघटना करणार...नागपूर : पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या...
जागोजागी होणारी लुट थांबवा, ...नगर : ‘‘राज्यात जागोजागी प्रत्येक क्षेत्रात...
‘घटनादुरुस्ती करून आरक्षण देणे  हाच...कोल्हापूर : घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षण देणे...
कोकणातील डच, पोर्तुगाल वखारींचे होणार...पुणे : भारतातील आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारासाठी...
गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणासाठी ...मुंबई ः गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणाबाबत...
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींना पाच पट...नाशिक : देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग...
आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची इच्छाच...पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्याची राजकीय...
नांदेडमध्ये थकीत ‘एफआरपी’साठी धरणेनांदेड : ऊस गाळप होऊनही पैसे न दिल्याने...