बेदाणा निर्मितीसाठी रसायनांच्या खरेदीसाठी पूर्वनोंदणी सुरू ः बोराडे

बेदाणा निर्मितीसाठी लागणारी डिपिंग ऑइल व पोटॅशिअम कार्बोनेट ही रसायनांसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी आपली मागणी नोंदवावी’’, अशी माहिती महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र बोराडे यांनी दिली.
Chemicals for the production of bedana Pre-order Registration for buying : Borade
Chemicals for the production of bedana Pre-order Registration for buying : Borade

नाशिक : ‘‘महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ व सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या सहकार्याने बेदाणा निर्मितीसाठी लागणारी डिपिंग ऑइल व पोटॅशिअम कार्बोनेट ही रसायने सह्याद्री फार्म, मोहाडी येथे देण्यात आली. पहिल्या टप्प्यात द्राक्ष उत्पादकांनी ते खरेदी केल्याने उपलब्ध साठा संपला आहे. मात्र, पुन्हा त्याचा पुरवठा केला जाईल. इच्छुक शेतकऱ्यांनी आपली मागणी, पूर्ण नाव व पत्ता यांसह मोबाईल नंबर ७०६६०३७३६९ वर एसएमएस व व्हॉट्सऍपद्वारे नोंदवावी’’, अशी माहिती महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र बोराडे यांनी दिली. 

सध्या बेदाणा निर्मितीसाठी द्राक्ष उत्पादकांना आवश्यक रसायनांची गरज आहे. केंद्रीय कृषी सचिव श्री.अग्रवाल व राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी दखल घेतली आहे. त्यांनी द्राक्ष बागायतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. डिपिंग ऑईल उत्पादक कंपन्यांशी बोलून त्यांना कच्चा माल ते उत्पादन करण्यास येणाऱ्या अडचणी सोडवून सहकार्य केले. त्यामुळे पुढील ३ ते ४ दिवसांत डिपिंग ऑईल व पोटॅशियम कार्बोनेट सह्याद्री फॉर्म्स मोहाडी (दिंडोरी) येथे उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील द्राक्ष काढणी होत नसल्याने अनेक उत्पादकांनी बेदाणा निर्मितीचा पर्याय निवडला आहे. मात्र, सध्या आवश्यक रसायनांची टंचाई आहे. ती जशीजशी उपलब्ध होतील, त्यानुसार रास्त दरात उपलब्ध करून दिली जातील, असेही सांगण्यात आले. रसायनांची खरेदी करण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक असल्याचे बोराडे व सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी कळविले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com