agriculture news in marathi chewing leaf Nagveli demand increase in sangli | Agrowon

सांगलीतील नागवेलीच्या पानांना मागणी वाढली

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 एप्रिल 2020

कोरोना विषाणूमुळे परराज्यातून येणाऱ्या नागवेलीच्या पानांची आवक ठप्प झाल्याने सांगली जिल्ह्यातील पानांना मागणी वाढली आहे. परंतु बाजारपेठेतील दराचा कल आणि बंद वाहतूक व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

सांगली : कोरोना विषाणूमुळे परराज्यातून येणाऱ्या नागवेलीच्या पानांची आवक ठप्प झाल्याने सांगली जिल्ह्यातील पानांना मागणी वाढली आहे. परंतु बाजारपेठेतील दराचा कल आणि बंद वाहतूक व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

सांगली जिल्ह्यात सुमारे ६००एकर पानमळ्यांचे क्षेत्र आहे. मिरज पूर्व भागात सर्वाधिक पानमळे आहेत. या भागातील आरग, बेडग, नरवाड, लिगणूर या गावात मोठी बाजार पेठ आहे. इथली नागवेल संपूर्ण राज्यासह परराज्यात येथील जातात. डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्याच्या कालावधीत वेलांची उतरण करून पुन्हा नवीन पान कापणी येते. सध्या वाढती उष्णता असल्याने त्याच्या वाढीवर परिणाम होऊ लागला आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. यामुळे संपूर्ण देश बंद आहे. देशासह राज्यातील वाहतूक सुविधादेखील बंद करण्यात आली आहे. त्यामुळे परराज्यातील नागवेल वाहतूक थांबली आहे. सध्या जिल्ह्यातील आगाप पानाची कापणी सुरू झाली आहे. ही पाने कोकणात विक्री केली जाते आहे. त्यामुळे शेतकèयांना दिलासा मिळाला आहे. परंतु दराचा कल अजूनही व्यापाऱ्यांनी गुलदस्त्यात ठेवल्याने शेतकरी दराची प्रतीक्षा करू लागला आहे.
...
कोकणात मागणी
मिरज पूर्व भागातील पानांचे सौदे संध्याकाळी होतात. त्यानंतर खासगी गाडीने राज्यासह इतर राज्यात पाठवले जातात. सध्या कोकणात मागणी असल्याने तेथील व्यापारी वाहतूक परवाना घेऊन थेट जागेवर खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
...
खतांची कृत्रिम टंचाई
पानमळ्यासाठी दर्जेदार पाने तयार आणण्याकरिता शेंग पेंड, करंजी पेंड, लिंबोळी पेंड, यासह विविध प्रकारची जैविक औषधांची गरज असते. परंतु सध्या देश बंद आहे. तसेच औषध तयार करणाऱ्या कंपन्यांत औषध निर्मिती देखील बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रात ही औषधे उपलब्ध नाही. परिणामी नागवेलीच्या फूटवा कमी येत आहे. त्यामुळे पानांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
...
प्रतिक्रिया...
सध्या पानाची कापणी सुरू झाली आहे. हळूहळू विक्री देखील सुरू झाली आहे. परंतु नागवेलीच्या दराबाबत व्यापाऱ्यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे आम्ही दराच्या प्रतीक्षेत आहे. कोरोनाच्या पाश्र्वर्भूमीवर वाहतूक व्यवस्था सुरू करावी. 
- चंद्रकात खाडे, बेडग, ता. मिरज. 


इतर ताज्या घडामोडी
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...
अकोटमध्ये अतिवृष्टीने कपाशी पाण्याखालीअकोला ः आजवर झालेल्या सततच्या पावसाने अकोट...
बुलडाण्यातील नुकसानीचे पंचनामे करून...बुलडाणा : पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे...
सातगाव पठारावर नुकसानग्रस्त बटाट्याचे...पुणे :‘‘लांबलेला मॉन्सून, सततचा कोसळणारा वादळी...
गाव पातळीवरील बैठका, सभा तात्पुरती...अकोला ः कोवीड १९ च्या वाढत्या प्रभावामुळे गाव...
नोकर भरतीची वयोमर्यादा वाढवाः...चंद्रपूर : कोरोना संकटामुळे या वर्षात नोकरीकरता...
लातूर, उस्मानाबादेत एक लाख ४१ हजार...उस्मानाबाद / लातूर : लातूर व उस्मानाबाद...
औरंगाबाद, जालन्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड...
मजुरांना कष्टाचे तरी पैसे मिळावेत नगर ः राज्यातील साखर कारखान्यांची तब्बल ८० हजार...
पोषक चाऱ्यासाठी ओट लागवडजनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी अधिक पोषणमूल्य...
राज्यात सोयाबीन २५०० ते ३९७४ रुपये नगरमध्ये ३००० ते ३७०० रुपये  नगर येथील...
कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पीक नियोजनकोरडवाहू  भागातील जमिनीतील ओलावा हा...
हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी फुले...महात्मा फुले कृषि विदयापिठाने कंबाईन हार्वेस्टरने...
मानवी आहारासाठी पोषणयुक्त जैवसंपृक्त वाणजैवसंपृक्त पिकांची लागवड केल्यास पौष्टिक व...
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...