चिकन, अंडी खाण्यास पूर्णपणे सुरक्षित ः पशुसंवर्धन आयुक्त सिंह

पूर्णपणे उकडलेली अंडी आणि चिकन खाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असून, नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.
chicken festival
chicken festival

पुणे ः पूर्णपणे उकडलेली अंडी आणि चिकन खाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असून, नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. आयुक्तांनी  शुक्रवारी (ता. १५) स्वतः चिकन फेस्टिव्हलमध्ये सहभगी होत चिकन खाण्याचा संदेश दिला.  राज्यात बर्ड फ्लूची लागण झालेल्या कोंबड्या, बगळे, पोपट, कावळे यांची संख्या ३ हजार ९४९ एवढी झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बाधित क्षेत्रातील सुमारे १५ हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्याची माहितीही आयुक्त सिंह यांनी दिली. पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या वतीने बर्ड फ्लूबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी चिकन फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते.   या वेळी पशुसंवर्धन आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चिकन खाऊन गैरसमज दूर केले. या वेळी बोलताना आयुक्त सिंह म्हणाले, ‘‘राज्याच्या विविध भागांत पक्ष्यांच्या मरतुकीच्या घटना घडत आहेत. या प्रत्येक घटनेची नोंद पशुसंवर्धन विभागाकडून घेतली जात असून, मृत पक्ष्यांची तपासणीसाठी भोपाळच्या प्रयोगशाळेत केले जात आहे. त्याचा अहवाल सादर झाल्यावर आणि तो पॉझिटिव्ह असल्यावर १० किलोमिटरचा परिसर बाधित करण्यात येत असून, एक किलोमीटर अंतरातील कोंबड्यांवर निरीक्षण ठेवले जात आहे. विविध ठिकाणांचे सर्वेक्षण सुरू असून, जसे निकाल येतील त्याप्रमाणे उपाययोजना सुरू आहेत. दरम्यान, पुण्यातील पश्‍चिम विभागीय रोग अन्वेषण प्रयोगाळेत ८४ नमुने दाखल झाले होते. त्यामधील १२ नमुने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर इतर अहवाल प्रलंबित आहेत. यामध्ये  परभणी, लातूर, नांदेड, रायगड, नाशिक, मुंबई येथील समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com