राज्यात आजपासून हरभरा खरेदी

हरभरा खरेदी आजपासून
हरभरा खरेदी आजपासून

परभणी : नाफेड आणि विदर्भ सहकारी विपणन महासंघाच्या केंद्रांवर किंमत समर्थन योजनेअंतर्गत २०१८-१९ च्या हंगामातील हरभऱ्याची हमीभावाने खरेदी करण्यासाठी कृषी विभागाच्या द्वितीय अंदाजानुसार राज्यातील ३३ जिल्ह्यांसाठी प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यासाठी सर्वाधिक १२ क्विंटल, तर बीड जिल्ह्यासाठी सर्वांत कमी १ क्विंटल ७५ किलो एवढी उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे. जिल्हानिहाय उत्पादकतेनुसार सोमवार (आज)पासून हरभरा खरेदी सुरू करावी, असे आदेश सहकार, पणन, वस्त्रोद्योग विभागांतर्फे देण्यात आले आहेत.  किंमत समर्थन योजनेअंतर्गत राज्यामध्ये नाफेड आणि विदर्भ सहकारी विपणन महासंघातर्फे हमीभावाने हरभरा खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. परंतु अनेक ठिकाणी पोर्टलची लिंक मिळत नसल्यामुळे नोंदणीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे अद्याप नोंदणी सुरू न झालेल्या केंद्रांवर हरभरा खरेदी उशिराने सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, बाजारपेठेत नवीन हरभऱ्याची आवक सुरू झाली असून, प्रतिक्विंटलचे दर चार हजार रुपयांपेक्षा कमी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे हमीभाव केंद्रावर तत्काळ हरभरा खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. २०१८-१९ मध्ये हमीभावाने हरभरा खरेदीसाठी निश्चित केलेली जिल्हानिहाय प्रतिहेक्टरी उत्पादकता (क्विंटलमध्ये)  : परभणी ५.८०, हिंगोली १०.६०, नांदेड ८, लातूर ६.५०, उस्मानाबाद ४.५०, बीड १.७५, जालना ३.५०, औरंगबाद ४.५०, बुलडाणा ८, अकोला ११.५०, वाशीम ६.५०, अमरावती १२, यवतमाळ ८.१०, वर्धा १०.३०, नागपूर १०.५०, भंडार ६, गोंदिया ८.२०, चंद्रपूर ७.५०, गडचिरोली ४, नाशिक ७.५०, धुळे ६.५०, नंदूरबार ६.८५, जळगाव ९.६०, नगर २.२०, पुणे ३.४०, सोलापूर ६, सातारा ६, सांगली ६.८५, कोल्हापूर ९.५०, रत्नागिरी ६.९०, रायगड ३.९०, पालघर ६.६२, ठाणे ६.३७. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com