Agriculture news in marathi chickpea Yield decreased This Year, 3 to 4 quintals drop per acre | Page 2 ||| Agrowon

हरभऱ्‍याचा उतारा यंदा घसरला, एकरी ३ ते ४ क्विंटल उत्पादन

टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 मार्च 2021

यंदाच्या हंगामात चांगला पाऊस झाल्याने रब्बीत हरभऱ्याचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला होता. सध्या हरभऱ्याची सोंगणी सुरू झाली असून,  सोंगणीचा दर वाढल्याने आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

सुलतानपूर, जि. बुलडाणा : यंदाच्या हंगामात चांगला पाऊस झाल्याने रब्बीत हरभऱ्याचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला होता. सध्या हरभऱ्याची सोंगणी सुरू झाली असून,  गतवर्षीपेक्षा सोंगणीचा दर वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. लोणार तालुक्यातील ग्रामीण भागात हरभरा सोंगणीचा दर प्रती एकर दोन हजार रुपयांवर पोचला आहे, तर दुसरीकडे उत्पादन एकरी तीन ते चार क्विंटल दरम्यान होत आहे. 

यंदा सततचा पाऊस व परतीच्या पावसाने खरीप हंगामातील सर्वच पिकांची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातून हंगाम गेला होता. ही आर्थिक उणीव रब्बीतून वसूल होईल, या हेतूने शेतकऱ्यांनी पैशांची जुळवाजुळव करून पेरणी केली. परिसरात हरभऱ्याला पसंती देण्यात आली होती.

सध्या हरभरा सोंगणी सुरू झाली आहे. हरभरा सोंगणीचा दर वाढल्याने शेतकऱ्यांना खर्च जड जात आहे. हरभऱ्याचे पीक शेतात बहरलेले असताना चांगले उत्पादन होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र ऐन फूल धारणेच्या वेळी ढगाळ वातावरण व पहाटेच्या सुमारास पडलेल्या धुक्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सध्या परिसरात हरभऱ्याचे प्रती एकर ३ ते ४ क्विंटलच उत्पादन होत असल्याचे चित्र आहे.

प्रतिक्रिया..
ढगाळ वातावरणामुळे सुलतानपूर परिसरातील हरभऱ्याचे नुकसान झाले. उत्पादनात मोठी घट आली आहे. मजुरी महागल्याने शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे.
-नारायण पिसे, शेतकरी, शिवणीपिसा, ता. लोणार. जि. बुलडाणा.

 हरभरा सोंगणी दर :

  • सरासरी दोन हजार रुपये एकर
  •  हरभरा काढणी : २०० रुपये पोते
  •  उत्पादन :३ ते ४ क्विंटल

इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...
धान चुकाऱ्याअभावी शेतकऱ्यांची आर्थिक...गोंदिया : गेल्यावर्षी आधारभूत दराने धान विक्री...
सांगलीत खरिपासाठी हवे ३३ हजार ६९०...सांगली  : यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कृषी...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
तुलनेत यंदा दुपटीने गाळपकोल्हापूर : गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, कांदा, फळ...जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीत...
अस्वलाकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी...भंडारा : जंगलालगत असलेल्या शेतीत वन्यप्राण्यांचा...
अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, ‘...मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर...
अति उष्ण, ढगाळ हवामानआठवडा अखेरपर्यंत ते १००६ हेप्टापास्कल इतके राहतील...
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे...पुणे ः बहुप्रतीक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड...
नाशिक : माथाडी युनियनकडून ‘काम बंद’नाशिक : राज्य शासनाच्या विविध माथाडी मंडळातील...
पुणे ‘जि.प.’तर्फे कर्मचाऱ्यांना मिळणार...पुणे ः ‘‘जिल्हा परिषदेच्या बक्षिस योजनेतून आता...
‘खरिपात सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरा’सातारा : येत्या खरीप हंगामात  सोयाबीनचे...
वाशीम जिल्ह्यात कृषी निविष्ठा...वाशीम : जिल्ह्यातील शेतकरी, कंपनी प्रतिनिधी आणि...
रसवंतीचालक, ऊस उत्पादकांना आर्थिक...बुलडाणा : ‘‘जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो शेतकरी...
‘ताकारी’तून तिसरे आवर्तन सुरूवांगी, जि. सांगली  : ताकारी योजनेतून यंदाचे...
नगर, नाशिकमध्ये १४ साखर कारखान्यांचा...नगर ः नगर, नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत २६...
सांगलीत द्राक्ष बागांची खरड छाटणी अंतिम...सांगली : पुढील हंगामातील घडांची निर्मिती आणि...
‘कादवा’कडून ३०० चा तिसरा हप्ता...नाशिक : ‘‘कादवा सहकारी साखर कारखान्याचे गळीत...
सोलापूरच्या कृषी विभागात कोरोनाचा शिरकावसोलापूर ः जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा विळखा वरचेवर...