agriculture news in marathi, chief minister devendra fadenvis meet with central home minister amit shah, new delhi | Agrowon

लवकरच नवीन सरकार स्थापन होईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

सत्तेच्या समीकरणाच्या संदर्भात कोण काय बोलत आहे, यावर मी काहीही प्रतिक्रिया देणार नाही. भाजपमधील कोणीही बोलणार नाही. महाराष्ट्राला नव्या सरकारची आवश्‍यकता असून, नक्कीच सरकार स्थापन होईल. लवकरात लवकर नवे सरकार बनेल. आम्ही त्यासाठी आश्‍वस्त आहोत.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

नवी दिल्ली  ः "महाराष्ट्रात लवकरात लवकर नवे सरकार स्थापन होईल. आम्ही त्याबाबत पूर्णपणे आश्‍वस्त आहोत,'' असा आत्मविश्‍वास काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर व्यक्त केला. शिवसेनेच्या आक्रमक दाव्यांची दखल घेण्याचेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी टाळले. अर्थात, गृहमंत्र्यांशी झालेली भेट ही राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी असल्याची पुस्ती त्यांनी जोडली.

महाराष्ट्रात युतीचे भागीदार भाजप आणि शिवसेना या दोन्हीही पक्षांमध्ये तुंबळ वाक्‌युद्ध पेटल्यामुळे सरकार स्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता.४) अमित शहा यांची दिल्लीत भेट घेऊन सरकार स्थापनेच्या रणनीतीची चर्चा केली आणि "लवकरात लवकर आम्ही नवे सरकार देऊ,' असे आत्मविश्‍वासाने भरलेले विधान केले. अमित शहा यांच्या निवासस्थानी चाळीस मिनिटे दोन्ही नेत्यांची बंद दरवाजाआड खलबते झाली. भाजपच्या अन्य कोणत्याही नेत्याचा त्यात सहभाग नव्हता. या भेटीनंतर महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी युतीच्या कोंडीवर भाष्य करण्याचे टाळताना सरकार स्थापनेच्या हालचालींवर आणि शिवसेनेकडून होणाऱ्या आक्रमक दाव्यांबद्दल बोलण्यास नकार दिला.

महाराष्ट्रात बिगरमोसमी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून, ३२५ तालुक्‍यांमध्ये ८० ते १०० टक्‍क्‍यांपर्यंत हानी झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून मदत मिळावी, अशी मागणी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली असून, पावसामुळे झालेल्या हानीचा अंदाज त्यांना सादर केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाठविले जाणार असून, पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यासाठी मदतीची भूमिका घ्यावी, नियमांचा उगाच बाऊ करू नये, यासाठी केंद्र सरकारने विमा कंपन्यांची बैठक घेऊन सूचना द्याव्यात, अशीही मागणी केली. शहा यासाठी विमा कंपन्यांशी चर्चा करणार आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी सांगितले.
 


इतर ताज्या घडामोडी
पुणे विभागात गव्हाचा १ लाख ६८ हजार...पुणे  ः पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या...
खासदार औद्योगिक महोत्सवाच्या माध्यमातून...नागपूर  ः खासदार औद्योगिक महोत्सवाच्या...
अकोला कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे...अकोला  : ‘कृषी’चे पदव्युत्तर शिक्षण हे...
तीन जिल्ह्यांत तूर विक्रीसाठी २९...नांदेड  ः मराठवाड्यातील नांदेड, परभणी,...
आळसंद येथील पशुवैद्यकीय दवाखाना उद्‌...आळसंद, जि. सांगली : आळसंद (ता. खानापूर) येथे...
तीन जिल्ह्यांत सतरा लाख ४१ हजार क्विंटल...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
जावळी तालुक्यात वन्यप्राण्यांकडून... मेढा, जि. सातारा : जावळी तालुक्‍यात...
कातळावरील गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीचा...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कांदळगाव (ता. मालवण)...
सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांना सुविधा...नाशिक : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देऊन त्यांचा...
महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात रताळी,...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
बदलत्या हवामानात कृषी जैवविविधतेचे...संयुक्त राष्ट्रसंघाच्या कृषी जैवविविधता आणि अन्न...
हरितगृह वायू कोणते?मागील लेखामध्ये हरितगृह परिणाम म्हणजे काय, ते आपण...
जागतिक तापमानवाढीवर हरितगृह वायूंचा...सध्या सर्वत्र तापमानवाढीची चर्चा असली, तरी...
गिरणा परिसरात कांदा लागवडीकडे कलमेहुणबारे, जि. जळगाव  ः चाळीसगाव तालुक्‍यात...
घराघरांत पोचणार नळ कनेक्‍शन, बसणार मीटर...जळगाव  : जिल्ह्यात ग्रामीण भागातील जनतेला...
जळगाव जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेतून...जळगाव : राज्यातील महाविकास आघाडी शासनाने महात्मा...
शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक कर्जमुक्तीचा...अकोला ः शेतकरी कर्जदार नसून तो भूमीचा राजा आहे....
केंद्राच्या पथकाकडून लासलगावला कांदा...नाशिक  : कांद्याचे घसरते बाजार भाव पाहता...
`रेशीम प्रकल्पाच्या मंजुरीसाठी...औरंगाबाद : राज्यातील रेशीम उद्योगाच्या एकूणच...
अमरावती येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना...अमरावती ः जिल्हा परिषदेत आठवड्यातील दोन दिवस...