agriculture news in Marathi, chief minister Devendra Fadnvis says, seven thousand crore package will demand, Maharashtra | Agrowon

दुष्काळी उपाययोजनांसाठी सात हजार कोटींचा प्रस्ताव
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

उस्मानाबाद ः दुष्काळी परिस्थितीत चाराटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना चारा पिके घेण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. राज्यातील दुष्काळी उपाययोजनांसाठी सुमारे सात हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. लवकरच केंद्राचे पथक राज्यात येऊन परिस्थितीचा आढावा घेईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

 उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता. ६) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कामगार कल्याणमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, पालकमंत्री अर्जून खोतकर आदी या वेळी उपस्थित होते. 

उस्मानाबाद ः दुष्काळी परिस्थितीत चाराटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना चारा पिके घेण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. राज्यातील दुष्काळी उपाययोजनांसाठी सुमारे सात हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. लवकरच केंद्राचे पथक राज्यात येऊन परिस्थितीचा आढावा घेईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

 उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता. ६) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कामगार कल्याणमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, पालकमंत्री अर्जून खोतकर आदी या वेळी उपस्थित होते. 

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शहरात आले होते. सकाळी ११ वाजल्‍यापासून त्यांनी महसूल तसेच गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की पशुधन जगविण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक स्तरावर चारा उपलब्ध व्हावा, यासाठी पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना चारापिकांसाठी अनुदान दिले जाईल. पिण्याच्या पाण्यासह इतर उपाययोजनासाठी सुमारे सात हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. काँग्रेसकडून पीकविमा योजनेवर आरोप केले जात असले तरी काँग्रेसपेक्षा आमच्या कार्यकाळात जास्तीचा विमा शेतकऱ्यांना दिल्याचेही मुख्यंत्र्यांनी या वेळी सांगितले. 

उस्मानाबाद-लोहारा तालुक्यांना मदत मिळणार 
गेल्यावर्षी प्रशासनाच्या चुकीने उस्मानाबाद तसेच लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नसल्याची कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली. लवकरच त्याची रक्कमही अशा शेतकऱ्यांना दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. 

नाबार्डकडून २२०० कोटी येणार? 
कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी निधी मिळणार नव्हता. यावर उपायोजना म्हणून आम्ही नाबार्डकडे २२०० कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे मराठवाड्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागणार आहे. तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा अनेक तलावांतील गाळ काढण्याची प्रक्रिया केली जाईल. तेव्हा अशा तलावातील गाळ छोट्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत दिला जाईल. त्यासाठी आर्थिक मदत करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. 

फरकाची रक्कमही पाठविली 
गेल्या वर्षी हमीभावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांच्या हरभरा तसेच तुरीची खरेदी झाली. ज्या शेतकऱ्यांनी शासनाकडे विक्रीची नोंदणी केली आणि माल खरेदी करता आला नाही, अशा शेतकऱ्यांची फरकाची एक हजार रुपयांची मदत जिल्हास्तरावर वर्ग केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. 

इतर अॅग्रो विशेष
महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी लागवडीस वेगसातारा  ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई...
संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव...अकोला : संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर...
दुधाचे थकीत अनुदान देण्याच्या हालचालीपुणे: राज्यातील डेअरी उद्योगांचे अडकलेले...
अमरावती विभागात सोयाबीन उत्पादकता घटलीअमरावती  ः गेल्या काही वर्षांत कापसाला...
‘महाॲग्री ते महाॲग्रीटेक’ एक स्वप्नरंजन राज्यात शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन होतील असे एक...
शेण पावडरपासून कलात्मक वस्तूंची...सुमारे ३८ देशी गायींचे संगोपन करीत नागपूर येथील...
शेततळ्यातील पाण्यावर फुलले शेडनेटमधील...पावसाचे कायम दुर्भिक्ष, त्यामुळे शेती अर्थकारणाला...
राज्यात गाजर ११०० ते ८००० रुपये...जळगावात ११०० ते १८०० रुपये दर जळगाव कृषी...
ऋतुचक्र बदलया वर्षीचा मॉन्सून अनेक बाबींनी वैशिष्ट्यपूर्ण...
प्रतिष्ठेचं वलय होतंय द्राक्ष...द्राक्ष शेतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला...औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन...
सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक...सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या...
कडधान्य आयातीला मुदतवाढीचा प्रस्तावनवी दिल्लीः देशात यंदा खरिप काडधान्य पिकांची...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे: वाढलेल्या उन्हामुळे राज्यात चटका वाढला आहे...
परतीचा मॉन्सून आठ दिवसात माघारीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
आदर्श वनसंवर्धनातून ग्रामविकास साधलेले...वनसंपत्तीचे संवर्धन, वनविकासासह शेतीतही दिशादर्शक...
येतो मी... मॉन्सूनने घेतला देशाचा निरोप...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
शेतकऱ्यांच्याच कपाळावर पुन्हा ‘मिऱ्या’दिनांक ३ जुलै २०१९ रोजी केरळचे खासदार डीन...
आश्वासनांचा पाऊसराज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम...