‘वाकुर्डे बुद्रुक’च्या जलपूजनाला लवकरच येणार ः मुख्यमंत्री फडणवीस

‘वाकुर्डे बुद्रुक’च्या जलपूजनाला लवकरच येणार ः मुख्यमंत्री फडणवीस
‘वाकुर्डे बुद्रुक’च्या जलपूजनाला लवकरच येणार ः मुख्यमंत्री फडणवीस

शिराळा, जि. सांगली : अनेक वर्षांच्या संघर्षानंतर वाकुर्डे बुद्रुक उपसा सिंचन योजनेला चालना मिळाली असून ही योजना पूर्ण झाल्याशिवाय थांबणार नाही. लवकरच या योजनेच्या जलपूजनासाठी येऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेड (ता. शिराळा) येथे रविवारी (ता. २३) दिले.

वाकुर्डे उपसा सिंचन योजनेच्या वाकुर्डे मानकरवाडी रेड बंदिस्त मुख्य नलिका व त्यावरील वितरण व्यवस्था कामाचा प्रारंभ मौजे रेड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. 

या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, भगवानराव साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वाकुर्डे बुद्रुक उपसा सिंचन योजना बंदिस्त नलिकेद्वारे वितरण होणार असल्याने प्रत्येक शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पाेचेल. मोठ्या प्रमाणावर जमीन ओलिताखाली येईल. अनेक वर्षांपासून रखडलेल्या टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना पुढील सहा महिन्यांत टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील. सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील दीड लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. या योजनांसाठी शेतकऱ्यांची हजारो एकर अधिग्रहीत करावी लागली असती ती बंदिस्त नलिकेद्वारे काम होणार असल्याने आता अधिग्रहीत करावी लागणार नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची बचत झाली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सांगली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर डाळिंब, द्राक्ष व फळपिके घेतात. शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत आपला माल पाठवता यावा यासाठी जिल्ह्यात ड्रायपोर्ट तयार करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना येथून थेट विदेशात माल पाठविता येईल व त्यातून आर्थिक उन्नती होईल. चांदोली पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी मागणी करण्यात येत असलेली धरणाच्या खालील जागाही देण्यात येईल त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होतील. जिल्ह्यात लवकरच कृषी महाविद्यालय सुरू होत असल्याने सर्वांगिण विकासाला चालना मिळणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com