agriculture news in marathi, Chief Minister Fellowship Programme 2018 | Agrowon

युवकांना प्रशासनात सहभागी होण्याची संधी
वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम-२०१८ 

मुंबई : राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध पातळ्यांवर प्रयत्नशील असून, या विकासप्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील युवकांना मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम-२०१८ च्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. युवकांचा उत्साह, नाविन्यपूर्ण कल्पना व तंत्रज्ञानात त्यांना असलेली गती याचा फायदा प्रशासनास व्हावा यासाठी या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली असून, प्रतिभावान युवकांनी प्रशासनात सहभागी होण्यासह राज्याच्या विकासाला हातभार लावण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचे यंदा चौथे वर्ष असून, गेल्या तीन वर्षात या कार्यक्रमाला युवकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. दरवर्षी साधारण चार हजार अर्ज प्राप्त होत असून त्यातून ५० युवकांची निवड केली जाते. मुख्यमंत्री फेलोशिप हा ११ महिन्यांचा पूर्ण वेळ कार्यक्रम असून त्यात एकदाच सहभागी होता येते. कोणत्याही शाखेचा प्रथमवर्ग पदवीधर असणाऱ्या २१ ते २६ वर्षे वयोगटातील युवकांना २४ मे २०१८ पर्यंत या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज करता येईल. अधिक माहिती व अर्ज करण्यासाठी http://mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट देता येईल.

फेलोजच्या निवडीसाठी ऑनलाइन परीक्षा, निबंध व मुलाखत अशी निवडप्रक्रिया राबविली जाते. फेलोशिपच्या कालावधीत विविध विभागांसोबत काम करण्याच्या अनुभवासोबतच विविध मान्यवर संस्था व व्यक्तींसोबत संवाद साधण्याची संधीही फेलोजना मिळत असते. त्यामुळे राज्याच्या प्रशासनात आपल्या ज्ञानाचा व कौशल्याचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी युवकांनी या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...