agriculture news in marathi, chief minister ignore ujni water issue, latur, maharashtra | Agrowon

‘उजनी’च्या पाण्याला मुख्यमंत्र्यांकडून बगल
टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

सध्या मराठवाड्यावर पाणीटंचाईचे सावट आहे. पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत टंचाईची सर्व माहिती हाती येईल. त्यानंतर केंद्र शासनाचे पथक बोलावले जाईल. ते पाहणी करेल. त्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यात येईल. टंचाईवर मात करण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.

लातूर  ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूरला ‘उजनी’चे तर बीडला कृष्णा खोऱ्याचे पाणी देण्याबाबत भाष्य करतील, अशी अपेक्षा असताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात या विषयाला बगल दिली. निसर्ग आपली परीक्षा घेत असून, त्याला आव्हान देण्याचे काम आम्ही करत आहोत. संकटाच्या काळात सरकार तुमच्या पाठीशी आहे, असा आशावाद मात्र मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.

या वर्षी लातूरवर पाणीटंचाईचे सावट आहे. २०१६ मध्ये लातूरला भीषण टंचाईला सामोरे जावे लागले होते. रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस हे लातूर दौऱ्यावर आले होते. लातूरसाठी ‘उजनी’तून पाणी देऊ, अशी घोषणा त्यांनी केली होती. त्याचा सर्व्हे करण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. पण पुढे मात्र ही योजना बारगळली. दोन वर्षे सलग चांगला पाऊस झाल्याने या योजनेचा विसर सर्वांनाचा पडला. यावर्षी पुन्हा लातूरवर टंचाईचे संकट घोंगावत आहेत. परतीच्या पावसाची आशा धुसर झाली आहे. शहराला आठ ते दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे.

दरम्यान, रविवारी (ता. ७) अटल महाआरोग्य शिबिराचे उद्‍घाटन श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांनी आपल्या भाषणात लातूरला ‘उजनी’चे पाणी द्यावे, अशी मागणी केली. तोच धागा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात पकडला. बीडवरही पाणीटंचाईचे संकट आहे. त्यामुळे बीडला कृष्णा खोऱ्यातून तर लातूरला ‘उजनी’चे पाणी द्यावे, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही भाष्य केले. उजनी धरण हे माझ्याकडेच आहे. लातूरचा पाणी, आरोग्य व रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण श्री. फडणवीस यांनी मात्र आपल्या भाषणात उजनीच्या पाण्याला बगल दिली. यावर भाष्य करण्याचे त्यांनी टाळले. ‘जलयुक्त’च्या कामांवर त्यांनी भर दिला. निसर्ग कोपला आहे. टंचाईचे सावट आहे. निसर्गाला आव्हान देण्याचे काम करीत आहोत. निसर्ग परीक्षा घेत आहे. या काळात सरकार तुमच्या पाठशी आहे, असा आशावाद मात्र त्यांनी दिला. ‘उजनी’च्या पाण्याला बगल दिल्याने लातूरकरांमध्ये मात्र नाराजी आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यात पावसामुळे खरिपातील...पुणे ः गेल्या दोन दिवसांपूर्वी अनेक भागांत...
...तर ३२ गावांची जनावरे सातारा...कुकुडवाड, जि. सातारा : माण तालुक्‍यातील कुकुडवाड...
जनताच मुख्यमंत्री ठरविते ः देवेंद्र...मुंबई : मी एकट्या भाजपचा नव्हे, तर शिवसेना,...
नगर जिल्ह्यातील छावण्या आठ दिवसानंतर...नगर ः दोन दिवसांपूर्वी काही भागांत बऱ्यापैकी पाऊस...
मराठवाड्यात सव्वीस तालुक्‍यांत...औरंगाबाद : दोन दिवस बहुतांश भागांत पावसाची कृपा...
शिवसेना निवडणुकीला महत्त्व देणारा पक्ष...नगर : ‘‘जनआशीर्वाद यात्रेत जनतेचे आशीर्वाद व...
वाढीव शुल्कानुसार सत्राची नोंदणी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
काथरगाव येथे पुलाला लागून बांधलेला...संग्रामपूर जि. बुलडाणा ः खारपाणपट्ट्यात मोडणाऱ्या...
मसालावर्गीय पिकांसह भाजीपाला पिकांनी...नागपूर ः पावसाने खंड दिल्याच्या परिणामी कळमणा...
वाशीम जिल्ह्यात पीकविम्याची मुदत वाढून...वाशीम ः जिल्ह्यातील शेतकरी गेले वर्षभर विविध...
बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी दांपत्य...पिंपळगाव हरेश्‍वर, जि. जळगाव ः कामासाठी शेतात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला सिंधुदुर्ग ः  सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी (...
सातारा जिल्ह्यात मराठवाड्याच्या धर्तीवर...सातारा : ‘‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी...
पीक विमा भरण्यास शेतकऱ्यांना एक...मुंबई ः खरीप हंगामातील पीक विमा भरण्यापासून...
परभणी : गतवर्षीच्या खरिपातील विमा...परभणी ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत गतवर्षी(...
आटपाडी माती-पाणी परीक्षण प्रयोगशाळा...सांगली ः आटपाडी तालुक्‍यात डाळिंब व द्राक्षाचे...
आता तणसापासून होणार इथेनॉल उत्पादन : डॉ...भंडारा ः तणसापासून इथेनॉल निर्मिती प्रकल्प येत्या...
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...