बुलडाणा, वर्धा, नागपूर बँकांनी पीककर्ज वाटप सुरू करावे: मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

मुंबई: शेतकऱ्यांच्या हितासाठी बुलडाणा, वर्धा आणि नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये राज्य सहकारी बँकेने बीसी मॉडेल सुरू करून शेतकऱ्यांना तत्काळ कर्जपुरवठा सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी बुलडाणा, वर्धा आणि नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या अडचणीसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. बुलडाणा, वर्धा आणि नागपूर या अडचणीत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये बीसी मॉडेल सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सहकारी बँकेने दोन दिवसात नाबार्डकडे पाठवावा. नाबार्डने शेतकऱ्यांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेऊन या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी द्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.  शेतकऱ्यांच्या हितासाठी बँकांची उभारणी करण्यात आली आहे, परंतु बँका शेतकऱ्यांचे हित न पाहता स्वतःचा व्यवसाय पाहतात, हे चुकीचे आहे. या तिन्ही बँकांनी शेतकऱ्यांना तत्काळ कर्जपुरवठा सुरू करता यावा यासाठी अडचणीवर मार्ग काढून राज्य सहकारी बँक आणि नाबार्ड यांच्याशी समन्वय साधावा. बँकांची आणि नाबार्डची भूमिका ही शेतकऱ्यांना मदत करण्याची असली पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा बँका अडचणीत असलेल्या ठिकाणी जर शासकीय कार्यालये भाडेतत्त्वावर असतील तर ती कार्यालये जिल्हा बँकांच्या ताब्यात असलेल्या जागेत स्थलांतर केले तर त्या जागेचा उपयोग होईल आणि बँकांना मदत होईल यासंदर्भातील प्रस्तावाचा ही विचार करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या बैठकीला सहकारमंत्री सुभाष देशमुख, सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, सहकार आयुक्त सतीश सोनी, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर आनस्कर, नाबार्डचे महाप्रबंधक अलोक जेना उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com