agriculture news in Marathi, Chief minister says, Chatrapati Shahu Maharaj converted new Maharashtra, Maharashtra | Agrowon

छत्रपती शाहू महाराज यांनी नवमहाराष्ट्राची निर्मिती केली : मुख्यमंत्री
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 जून 2019

कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू महाराजांनी नव महाराष्ट्राची निर्मिती केली. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय'' या मार्गांनी महाराजांनी काम केले. त्यातून एक परंपरा सुरू झाली आणि या परंपरेचे पाईक म्हणून अनेकांनी काम केले, अशांनी आपल्या कर्तृत्वातून महाराष्ट्र घडवला. त्यात कै. विक्रमसिंह घाटगे यांचे नाव घेता येईल, असे गौरवोद्‍गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. १३) येथे केली. 

कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू महाराजांनी नव महाराष्ट्राची निर्मिती केली. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय'' या मार्गांनी महाराजांनी काम केले. त्यातून एक परंपरा सुरू झाली आणि या परंपरेचे पाईक म्हणून अनेकांनी काम केले, अशांनी आपल्या कर्तृत्वातून महाराष्ट्र घडवला. त्यात कै. विक्रमसिंह घाटगे यांचे नाव घेता येईल, असे गौरवोद्‍गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. १३) येथे केली. 

कागलच्या शाहू साखर कारखान्याचे संस्थापक कै. विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे अनावरण कारखाना कार्यालयाच्या परिसरात झाले. त्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात श्री. फडणवीस बोलत होते. त्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात श्री. फडणवीस बोलत होते. 

‘‘क्रीडा सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी काम केले. कै. घाटगे यांचे संपूर्ण आयुष्य बघितले तर इतक्‍या संस्था स्थापन करून त्यांनी समाजाचे परिवर्तन करण्याचे काम केले. हे सर्व करत असताना त्यांची संवेदनशीलताही महत्त्वाची आहे. कर्णबधिर मुलांची शाळा असो किंवा अनाथ मुलांसाठी शाळा असो त्यातून राजे किती संवेदनशील होते हे दिसून येते. राजकारणात एका वेगळ्या प्रकारचे राजकराण आणि समाजकारण केले. राजकारणात अनेक प्रसंग येतात, अशा प्रसंगात आपण धैर्य सोडत नाही, आपण फक्त काम करत राहतो, त्या वेळी समाजही मागे उभे राहतो,’’ असे मुख्यमंत्री फडणवीस या वेळी म्हणाले.  

या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे, संजय मंडलिक, धैर्यशील मान, आमदार अमल महाडिक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

इतर अॅग्रो विशेष
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...
कृत्रीम शीतपेयांना शोधला कोकणी नैसर्गिक...कोकणातील निसर्गरम्य कोळथर (ता. दापोली, जि....
फुलांनी आणला आयुष्यात बहर, अॅग्रोवनची...पुणे जिल्ह्यात रुई येथील सुहास लावंड यांनी...
जलव्यवस्थापनातील हुशारीतून फुलतेय ...दुष्काळाशी लढताना औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव...
दुष्काळातही कडवंची गावच्या अर्थकारणाची...भूगर्भीय सर्वेक्षण आधारित पाणलोटाची कामे, मृद...
मातीची सुपीकता टिकविणे आव्हानात्मक: डॉ...कोल्हापूर : कोल्हापूर विभागात मातीची सुपीकता...
साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या...मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना...
कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करारअकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य...
जीवनावश्‍यक वस्तू कायद्यावर प्रश्‍नचिन्हनवी दिल्ली: जीवनावश्‍यक वस्तू कायद्याची आवश्यकता...
जनतेचा पैसा जनतेच्याच भल्यासाठीतत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९ जुलै...