agriculture news in marathi, chief minister says economical development of state due to samruddhi highway, nagpur, maharashtra | Agrowon

समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक विकासात भर ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 जुलै 2019

अमरावती  : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक विकासात भर पडणार आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतीमाल मोठ्या बाजारपेठेत कमी वेळेत पोचविणे यामुळे शक्‍य होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

अमरावती  : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक विकासात भर पडणार आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतीमाल मोठ्या बाजारपेठेत कमी वेळेत पोचविणे यामुळे शक्‍य होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

बेलोरा विमानतळावरील विस्तारीत सेवांच्या प्रारंभप्रसंगी श्री. फडणवीस बोलत होते. कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे,, सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, विदर्भ विकास मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख, श्रीकांत देशपांडे, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, महापौर संजय नरवणे, खासदार रामदास तडस, नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे, अरुण अडसड, वीरेंद्र जगताप, यशोमती ठाकूर, रवी राणा, रमेश बुंदिले, विभागीय आयुक्‍त पियूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यावेळी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, की दळणवळणाच्या सुविधा गतिमान होणे काळाची गरज आहे. त्याकरिता सर्वच पर्यायांचा विचार करणे आवश्‍यक आहे. दर्जेदार रस्ते असतील तर शेतीमालासह औद्योगिक उत्पादनांची वाहतूक सुलभ आणि गतीने होईल. असाच गतिमान वाहतुकीचा पर्याय समृद्धी मार्ग उपलब्ध करून देणार आहे. गती वाढणार असल्याने मोठ्या बाजारपेठेपर्यंत पोचण्याचा कालावधी कमी होईल. हा पर्याय शेतकऱ्यांसह ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणाला पूरक ठरेल.

बळिराजा अभियानातून राज्यातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे येत्या दोन वर्षांत राज्याची सिंचन क्षमता  पूर्णत्वास जाणार आहे. विमानतळ विस्तारीकरणामुळे बेलोरा विमानतळावर मोठ्या आकाराची विमाने उतरण्याची सुविधा निर्माण होणार आहे. औद्योगिक वसाहतीतील भूखंड शिल्लक नसल्यामुळे अतिरिक्त वसाहतीसाठी जमीन अधिग्रहण करावी लागेल. मोठे प्रवासी आणि मालवाहू विमान वाहतुकीमुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे. बेलोरा विमानतळावरुन देशातील चार महत्त्वाच्या शहरासाठी विमानसेवा सुरू करण्यात येईल, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले. 


इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...
लातूर, उस्मानाबादमध्ये २० तूर खरेदी...लातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात हमी...
शेती करताना जैवविविधता जोपासणे आवश्यक...नाशिक : वाढत्या लोकसंख्येचा भार कृषी क्षेत्रावरही...
अकोला : तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीत...अकोला  ः शासनाकडून हमी भावाने तूर खरेदीसाठी...
भंडारा : शेतकरी किसान सन्मानच्या...भंडारा ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेला वर्षभराचा...
कवठेमहांकाळ तालुक्यात पाणीसाठ्यात वाढसांगली  ः कवठेमहांकाळ तालुक्यात ऑक्टोबर...
खानदेशात कांदा लागवड सुरूचजळगाव ः खानदेशात कांदा लागवड सुरूच असून, सुमारे...
असे करा घाटेअळीचे जैविक व्यवस्थापनघाटेअळी नियंत्रणासाठी सातत्याने रासायनिक...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...