औरंगाबाद व लातूर विभागात पीकविमा योजनेत तफावत : मुख्यमंत्री

औरंगाबाद व लातूर विभागात पीकविमा योजनेत घोटाळाः मुख्यमंत्री
औरंगाबाद व लातूर विभागात पीकविमा योजनेत घोटाळाः मुख्यमंत्री

मुंबई : औरंगाबाद व लातूर विभागातील काही जिल्ह्यांमध्ये लागवडीखालील क्षेत्र व पीकविमा क्षेत्रामध्ये तफावत असल्याचे आढळून आल्याचे सांगत राज्य सरकारने शुक्रवारी (ता. २८) पीकविमा योजनेतील घोटाळ्याची कबुली दिली. त्याचवेळी या संदर्भात चौकशीअंती विमा कंपनी दोषी असल्याचे सिद्ध झाल्यास त्या कंपनीस काळ्या यादीत टाकण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.  भाजप आमदार अतुल भातखळकर, राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी रब्बी हंगामातील पीक विमा योजनेतील गैरव्यवहारासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. रब्बी हंगामात ३३.८१ लाख हेक्टर क्षेत्रफळ लागवडीखाली असताना पीक विमा क्षेत्राखाली ४५ लाख हेक्टर क्षेत्र असल्याचे उघडकीस आले असून, या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सदस्यांनी केला. त्यावर औरंगाबाद येथे २.६८ लाख हेक्टर क्षेत्राऐवजी ८.४९ लक्ष हेक्टर विमा उतरवण्यात आला. तर लातूर येथे ७ लाख ८४ हजार क्षेत्राऐवजी १३ लाख १४ हजार क्षेत्राचा विमा उतरवण्यात आला असून, यामध्ये तफावत आढळून आल्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी मान्य केले.  विमा कंपन्यांकडून बँक आणि कॉमन सर्व्हिस सेंटरकडून हे काम करण्यात येते. विमा कंपन्यांबाबत चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. भविष्यात तफावत निर्माण होणार नाही यासाठी उपाययोजना आखण्यात येतील. विमा कंपनीने गैरव्यवहार केला असेल तर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही डॉ. बोंडे यांनी उपप्रश्नांना उत्तर देताना सांगितले. रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहण... २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मोठा गडबड घोटाळा आढळून आल्याचे ॲग्रोवनने मार्च २०१९ मध्ये उघडकीस आणले होते. योजनेत शेतकऱ्यांनी एकाच क्षेत्रासाठी दोनदा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी अर्ज भरल्याचे उघडकीस आले असून हे प्रकार पाहून प्रशासनही चक्रावले होते. राज्यात रब्बी हंगामात ३३ लाख हेक्टवर लागवड झाली असताना ४५ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरवण्यात आला. म्हणजेच, तब्बल बारा लाख हेक्टरवर बोगस सातबारा व पीक पेरा नोंदीच्या आधारे विम्याची बोगस प्रकरणे दाखल करण्याचा प्रयत्न दिसून आला होता. या प्रकरणात अहमदनगर, बीड, जालना, लातूर, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, सोलापूर हे जिल्हे मुख्यतः रडारवर होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com