agriculture news in marathi, chief minister says, government will take a action on guilty, mumbai, maharashtra | Agrowon

राज्य बँक घोटाळाप्रकरणी दोषींवर कारवाई करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

जळगाव  ः महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी न्यायालयाने जे आदेश दिले आहेत, त्यासंबंधी शासन दोषींवर कारवाई करणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे येथे गुरुवारी (ता. २२) महाजनादेश यात्रेदरम्यान आयोजित सभेत स्पष्ट केले. 

जळगाव  ः महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी न्यायालयाने जे आदेश दिले आहेत, त्यासंबंधी शासन दोषींवर कारवाई करणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे येथे गुरुवारी (ता. २२) महाजनादेश यात्रेदरम्यान आयोजित सभेत स्पष्ट केले. 

महाजनादेश यात्रा शुक्रवारी (ता. २३) जळगाव जिल्ह्यात दाखल झाली. यात्रा धुळ्यातून धरणगाव येथे पोचली. तेथे त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर यात्रा जळगावात दखल झाली. जळगाव शहरातील सागर पार्क मैदानात सभा झाली. या वेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरीपुरवठा मंत्री जयकुमार रावल, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, खासदार रक्षा खडसे, उन्मेष पाटील, आमदार एकनाथ खडसे, हरिभाऊ जावळे, सुरेश भोळे, संजय सावकारे, स्मिता वाघ, चंदूलाल पटेल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, महापौर सीमा भोळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, उपमहापौर अश्‍विन सोनवणे आदी उपस्थित होते.  

श्री. फडणवीस म्हणाले की ,भाजपला जळगावने नेहमीच साथ दिली आहे. मतदारांचा हा विश्‍वास कायम राहायला हवा. जळगावमध्ये जे प्रश्‍न अनेक वर्षे रखडलेले होते. त्यांना मंजुरी मिळाली आहे. अनेक आश्‍वासने पूर्ण करून कामे हाती घेतली आहेत. विकासाची गती अशीच कायम ठेवू. दुष्काळमुक्तीच्या दिशेने राज्याची वाटचाल सुरू आहे. अनेक महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प मार्गी लावले जातील. त्यात जळगाव जिल्ह्यातील प्रकल्पदेखील हाती घेतले जातील. जळगाव शहरातील प्रलंबित प्रश्‍न सोडविले आहेत, असेही ते म्हणाले. भुसावळ व जामनेर येथेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांशी संवाद साधला.


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...
सांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...
अठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...
सिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...
पशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...
निर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
खारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
चारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
शेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...
ऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...
नैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...