लोकसभा निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची: मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अकोला ः सध्याची लोकसभा निवडणूक जशी विकासाची, गरिबी हटविण्यासाठीची आहे, तशीच ती राष्ट्रीय अस्मितेचीदेखील आहे. देशाच्या सुरक्षिततेसाठी एक सक्षम नेतृत्व देणारी आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.   जिल्ह्यातील तेल्हारा येथे सोमवारी (ता. १५) दुपारी भाजप उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार प्रकाश भारसाकळे व इतर उपस्थित होते.      देशातील गरिबांचा विरोधी पक्षांवर विश्वास राहिलेला नाही. जेव्हा यांचे सरकार होते तेव्हा यांनी तिजोरीतील पैसा वाटला, पण तो पक्षातील नेत्यांनाच दिला. गरिबांना तसेच ठेवले. आता पुन्हा सत्तेत येण्यासाठी यांनी महाआघाडी केली आहे. पण त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.   वंचितांना पायावर उभे करण्याचे काम मोदी सरकारने केले. देशातील ५० कोटी लोकांना आरोग्याची हमी दिली. पाच लाखांपर्यंत उपचार मोफत केले जाणार आहेत. शेतकऱ्यांना थेट मदत देणे सुरू केले. त्यासोबतच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. जे राहिले आहेत त्यांनाही लाभ मिळतील. अकोला जिल्ह्यात चार वर्षात या सरकारने १२५० कोटी दिले आहेत. मोठ्या प्रमाणात शेतमालाची खरेदी या शासनाने केली आहे. ते पुढे म्हणाले, मोदींनी आता घोषणा केली आहे, की पुन्हा सरकार आल्यानंतर शेतकरी, शेतमजुरांना ते ६० वर्षांचे झाल्यानंतर पेन्शन दिले जाईल. जगाच्या पाठीवर शेतकऱ्यांना पेन्शन देणारा भारत हा पहिला देश असेल. शेतकऱ्याला एक लाखापर्यंत कर्ज बिनव्याजी दिले जाईल. ते कर्ज थकले तर त्यावर पाच वर्षे कुठलेही व्याज आकारले जाणार नाही. बळिराजा संजीवनी योजनेतून या जिल्ह्यातील १७१७ कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले आहेत. एक दीड वर्षात ही कामे पूर्ण झाल्यानंतर सिंचनाची सोय वाढेल. जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे उभे केले जात आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com