आघाडीचा जाहीरनामा फसवा ः देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

धुळे  : आघाडी सरकारचा काळ जनतेने अनुभवला आहे. त्यांनी जनतेला भूलथापा दिल्या. आता त्यांचा जाहीरनामा अनेक आश्‍वासनांनी भरलेला आहे. यात त्यांनी फसवी आश्‍वासने दिली आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

शिरपूर (जि. धुळे) येथे बुधवारी (ता.९) झालेल्या प्रचारसभेत श्री. फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. या वेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार सुभाष भामरे, डॉ. हीना गावित, माजी मंत्री अमरिश पटेल, आमदार काशीराम पावरा आदी उपस्थित होते. 

श्री. फडणवीस म्हणाले, की विरोधक निवडणुकीपूर्वीच हरले आहेत. त्यांच्याकडे तगडे उमेदवार नाहीत. पराभव दिसत असल्याने ते कोणतीही आश्‍वासने देत आहेत. त्यांना माहीत आहे, की आपण ही आश्‍वासने पूर्ण करू शकणार नाहीत. यामुळे ते फसवी आश्‍वासने देत आहेत. आमच्या सरकारने जी कामे केली ती सर्वांना दिसत आहेत. आमचे उमेदवार पूर्ण तयार आहेत. आमचा विजय निश्‍चित आहे, असेही ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com