agriculture news in marathi, chief minister says special water project for marathwada, mumbai, maharashtra | Agrowon

समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वळविणार ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

मुंबई  : कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये आणून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वैनगंगेतून वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा बोगद्यातून पूर्व आणि पश्चिम विदर्भाला देऊन मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. 

मुंबई  : कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये आणून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वैनगंगेतून वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा बोगद्यातून पूर्व आणि पश्चिम विदर्भाला देऊन मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. 

स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरुवारी (ता. १५) मंत्रालयातील ध्वजवंदन सोहळ्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.  ते म्हणाले, की राज्य शासनाने ‘जलयुक्त शिवार’च्या माध्यमातून राज्याला जल परिपूर्ण करण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षांत केला. गेल्या तीन ते चार वर्षांत कमी पावसामुळे महाराष्ट्रातील काही भागांत दुष्काळाचे संकट कायम राहिले. त्यावर मात करण्यासाठी कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी नदीच्या खोऱ्यात वळवून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यात येईल. तसेच वैनगंगा नदीचे तेलंगणात जाणारे पाणी वैनगंगा- नळगंगा योजनेत ४८० किमीचा बोगदा तयार करून पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील सर्व अपूर्ण सिंचन प्रकल्प केंद्र सरकारच्या निधीतून गतिमानतेने पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्य शासनाने गेल्या पाच वर्षांत शेती क्षेत्रात सुमारे १.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली. सुमारे ५० हजार कोटी रुपयांचा थेट लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
 
`सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी`
राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरस्थितीतून सावरण्यासाठी तिन्ही सैन्य दले, एनडीआरएफ, एसडीआरएफ, तटरक्षक दल आदींनी प्रचंड मेहनत घेतली. पूरग्रस्त नागरिकांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी राज्य शासन भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे. पुनर्वसनासाठी ६८०० कोटींचे पॅकेज तयार केले असून, विक्रमी वेळेत पुनर्वसन केले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

इतर बातम्या
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी...सिंधुदुर्ग  ः कर्जमुक्त आणि दुष्काळमुक्त असा...
मागण्या मंजूर झाल्याने ग्रामसेवकांचे...अकोला  ः विविध मागण्यांसाठी राज्यात २२...
उदयनराजे भोसले यांचा अखेर भाजपमध्ये...नवी दिल्ली  : राष्ट्रवादी काँग्रेसचे...
अनुदान अर्जांना १०० टक्के पूर्वसंमती...पुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांमधील...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशी विश्रांती घेतल्यानंतर अरबी...
कीडनाशके विक्री पात्रतेचा तिढा सुटलापुणे : देशात कीडनाशके विक्रीसाठी शैक्षणिक...
‘अमूल’कडून राज्यात कडवे आव्हानपुणे : राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत...
औषधी गुणधर्म लक्षात घेता, पेरू, शेवगा...सोलापूर ः ‘‘पेरू आणि शेवगा ही तशी दुर्लक्षित पिके...
मॉन्सूनचा मुक्काम लांबणारपुणे : निम्मा सप्टेंबर उलटूनही परतीच्या...
वंचित, कष्टकरी संघटना विधानसभा लढविणार...पुणे  : राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात...
अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टर शेती नापेरअकोला ः अनियमित पावसाचा यंदा खरिपाला मोठा फटका...
नाशवंत शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी...पुणे : राज्यातील नाशवंत शेतमालाचे काढणीपश्‍चात...
भंडारा जिल्‍ह्यात पावसामुळे शेकडो हेक्‍...भंडारा ः मध्य प्रदेशातील संततधारेमुळे जिल्ह्यात...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
`कांदा आयातीचे धोरण शेतकऱ्यांना...पुणे  : कांदा आयात करण्याचे केंद्र सरकारचे...
स्मार्ट ग्रामअंतर्गत सायखेडा, गिरोली,...वाशीम ः जिल्हा परिषद पंचायत विभागातर्फे...
जळगाव जामोद येथे फिरते मासळी विक्री...बुलडाणा  : मत्स्यव्यवसाय आणि नियोजन...
कृषी विज्ञान केंद्र मालेगावकडून...नाशिक : कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव महाराष्ट्र...
साठवणीसाठी खरेदी नसल्याने चीनमध्ये...चीनी आहारामध्ये लसणांचा वापर मोठ्या प्रमाणात होत...
अकोला जिल्हा बँकेची पूरग्रस्तांना १६...अकोला  ः सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील...