agriculture news in Marathi chief minister says we will be with you Maharashtra | Agrowon

आम्ही तुमच्यासोबत: मुख्यमंत्री

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन दिवसांत पावसाचा इशारा आहे. नुकसानभरपाई तर देऊच, मात्र सगळ्यांनी सावध राहा.

सोलापूर ः सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन दिवसांत पावसाचा इशारा आहे. नुकसानभरपाई तर देऊच, मात्र सगळ्यांनी सावध राहा. मी दिलासा देण्यासाठी आलोय. काळजी घ्या, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. 

अतिवृष्टी आणि त्यानंतर निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे सोलापूर जिल्ह्यावर मोठी आपत्ती कोसळली. सव्वालाख हेक्‍टरहून अधिक शेतपिकांचे नुकसान झाले. अनेक गावातील घरांची पडझड झाली. त्यातून लोक अद्यापही सावरत आहेत. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (ता.१९) अक्कलकोट तालुक्‍यातील नुकसानीची पाहणी केली. शिवाय तत्काळ मदत म्हणून येथे त्यांनी काही शेतकऱ्यांना धनादेशही दिले. 

अतिवृष्टीच्या नुकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री ठाकरे सोमवारी सकाळीच थेट अक्कलकोट तालुक्‍यातील सांगवी खुर्दला पोचले. परंतु पुढे पावसामुळे चिखल झाल्याने शेतकऱ्यांच्या बांधावर न जाण्याचा सल्ला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना दिला. तसेच बोरी नदीच्या पुलावरुनच शेतकऱ्यांशी संवाद साधा, असे सुचवले. तसा निरोप गावातील शेतकऱ्यांना दिला.

शेतकरीही थेट पावसाने ओरबडलेली पीके हातात घेऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचले. तिथे त्यांना आपली व्यथा सांगितली. तेव्हा मुख्यमंत्री ठाकरे यांनीही काळजी करु नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे, असे आश्‍वासन दिले. तसेच पंचनामे सुरु आहेत ना, नुकसान काय, काय झाले, अशी त्यांची विचारपूस केली. सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन दिवसांत पावसाचा इशारा आहे. नुकसानभरपाई तर देऊच, मात्र सगळ्यांनी सावध राहा. मी दिलासा देण्यासाठी आलोय. काळजी घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत, असं आश्‍वासन देत मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.  

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.

मदतनिधीवरुन टोलवाटोलवी
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सकाळी बारामती दौऱ्यावर होते. दुपारुन ते सोलापूर दौऱ्यावर येणार होते. त्यावेळी बारामती दौऱ्यात केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्याने मदत करावी, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्राने राज्याची देणी वेळेवर दिली, तर मदत मागायची गरज नाही, असे उत्तर देऊन त्यांच्यावर पलटवार केला. शेतकऱ्यांच्या मदतीच्या प्रश्‍नावर या दोघांनीही एकमेकांवर टोलवाटोलवी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात यात्रांअभावी अनेकांवर...सोनगीर, जि. धुळे  : खानदेशात पावसाळा वगळता...
नाशिक जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीसाठी...गिरणारे, जि. नाशिक : खरीप हंगामातील भात, भुईमूग,...
खांबाळे, पडवणे येथील आंबा, काजूची ६००...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील खांबाळे (ता....
बोडखा येथे ‘स्वाभिमानी’चे झाडावर...बुलडाणा : केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी...
औरंगाबादमध्ये केंद्राच्या कृषी...औरंगाबाद : केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी...
खानदेशात सव्वा लाख हेक्टरवर पेरणीजळगाव : खानदेशात मक्याची लागवड सुरूच आहे. रब्बी...
परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीच्या...परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
नाशिक विभागात रोज एक लाख टन उसाचे गाळपनगर  ः नाशिक विभागातील ३२ पैकी २५ साखऱ...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची ३४ हजार...औरंगाबाद : राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या...
कृषी कायद्यांविरोधात साताऱ्यात धरणेसातारा : शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी...
जालना जिल्ह्यात दहा हजार क्‍विंटलवर...जालना : ‘‘जिल्ह्यात मक्याची किमान आधारभूत...
महिनाभर जमीन आरोग्य सुधार अभियानऔरंगाबाद : जमिनीच्या सुपीकतेवर भर देण्याची गरज...
गहू, ज्वारी पिकांवरील खोडमाशीचे...बहुतांश ठिकाणी गहू व ज्वारी पिकाची पेरणी झाली आहे...
पिकाच्या संवेदनशील अवस्थेनुसार पाणी...रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात लसूण ५००० ते १३००० रुपयेनाशिकमध्ये ६२०० ते ११५०० रुपये  नाशिक :...
उत्तम भाजीपाला उत्पादनासाठी पोषक हवामानवाटाणा वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून या...
बहिरम यात्रा अखेर रद्दअमरावती : लाखो भाविकांचे कुलदैवत आणि विदर्भात...
महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची...सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात...
विधान परिषदेच्या सहा जागांचा आज निकालमुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर,...
सरसकट पीकविम्यासाठी महाजनआंदोलन उभारणारनांदेड : खरिपातील पिकांचा सरसकट विमा...