agriculture news in Marathi, chief Minister stay on Wan project water reservation , Maharashtra | Agrowon

‘वान’च्या पाणी आरक्षणाला मुख्यमंत्र्यांनी दिली स्थगिती
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

अकोला  ः जिल्ह्यातील वान प्रकल्पातून अकोला शहरासाठी २४ दलघमी पाणी आरक्षण करण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी (ता. १०) सायंकाळी तातडीने स्थगिती दिली. यामुळे अकोट, तेल्हारा तसेच संग्रामपूर तालुक्यांमध्ये शासनाच्या विरुद्ध वाढत चाललेला विरोध शांत होण्याची शक्यता आहे. अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी पाणी आरक्षणावरून होत असलेला विरोध मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचविला होता.

अकोला  ः जिल्ह्यातील वान प्रकल्पातून अकोला शहरासाठी २४ दलघमी पाणी आरक्षण करण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी (ता. १०) सायंकाळी तातडीने स्थगिती दिली. यामुळे अकोट, तेल्हारा तसेच संग्रामपूर तालुक्यांमध्ये शासनाच्या विरुद्ध वाढत चाललेला विरोध शांत होण्याची शक्यता आहे. अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी पाणी आरक्षणावरून होत असलेला विरोध मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचविला होता.

जिल्ह्यातील वान प्रकल्पावरून अकोला शहराला वाढीव पाणीपुरवठ्यासाठी २४ दलघमी पाणी आरक्षण करण्यास शासनाने काही दिवसांपूर्वी मंजुरी दिली होती. त्यावरून जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा तसेच बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली. याबाबत आमदारांनाच शेतकऱ्यांनी धारेवर धरले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदत देत मंगळवारी तेल्हारा, अकोट तालुका बंदीची हाक देण्यात आली.

दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. नागरिकांनी पाणी आरक्षणाच्या मुद्याला केलेला विरोध हा नुकसानकारक ठरू शकतो. जनक्षोभ वाढतच असल्याने अखेर मंगळवारी रात्री उशिरा पाणी आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असल्याचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी सांगितले. अकोला शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्यासाठी वान प्रकल्पातून पाणी आरक्षण करताना सिंचनाचा विचार केला गेला नव्हता हे स्पष्ट झाले.

पिण्याच्या पाण्याला प्राधान्य लक्षात घेता पाणी आरक्षण दिले असले तरी सिंचनात होणारी कपात हा मुद्दा समोर करून शेतकऱ्यांनी शासनाच्या निर्णयाविरुद्ध मोठा रोष व्यक्त केला. सिंचनामध्ये अकोला शहराच्या पाणी आरक्षणामुळे बाधा येणार नाही. शेतकऱ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न झाला. मात्र शेतकऱ्यांचा विरोध सुरू असल्याने आ. भारसाकळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून पाणी आरक्षण आदेशाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी विनंती केली. अखेरीस मुख्यमंत्र्यांनी स्थितीचा आढावा घेऊन पाणी आरक्षण आदेशला स्थगिती दिली आहे.

इतर अॅग्रो विशेष
महाराष्ट्राप्रमाणे आम्हालाही विकसित...पुणे : महाराष्ट्रातील शेतकरी पीक उत्पादन...
कांदा खाणाऱ्यांचा विचार करता, मग...नाशिक : कांद्यातील भाववाढीला आळा घालण्यासाठी...
द्राक्षपंढरीत गोड्या छाटण्यांना सुरवातनाशिक : चालू वर्षीच्या द्राक्ष हंगामाला सुरवात...
युरियाशिवाय शेती विचार रुजला तरच...नागपूर ः सेंद्रिय शेतीचा विचार गेल्या अनेक...
...अखेर ऊसतोड कामगार महामंडळ स्थापनमुंबई ः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या...
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
नागपूर जिल्हा बॅंक घोटाळा निकाली...नागपूर ः नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील...
शेतकरी कंपन्यांकडून हमीभावाने खरेदीची...पुणे : किमान हमीभाव खरेदीच्या कार्यक्रमात शेतकरी...
राज्यात उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने...
राज्यात नवे जलधोरणपुणे : राज्याच्या जुनाट जलधोरणाला अखेर मूठमाती...
कृषी विभाग उभारणार गाव पातळीवर शेतकरी...नागपूर ः ग्रामपंचायत कार्यालयात कृषी सहायकांकरिता...
अनुदान अर्जांना १०० टक्के पूर्वसंमती...पुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांमधील...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशी विश्रांती घेतल्यानंतर अरबी...
कीडनाशके विक्री पात्रतेचा तिढा सुटलापुणे : देशात कीडनाशके विक्रीसाठी शैक्षणिक...
‘अमूल’कडून राज्यात कडवे आव्हानपुणे : राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत...
मॉन्सूनचा मुक्काम लांबणारपुणे : निम्मा सप्टेंबर उलटूनही परतीच्या...
अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टर शेती नापेरअकोला ः अनियमित पावसाचा यंदा खरिपाला मोठा फटका...
नाशवंत शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी...पुणे : राज्यातील नाशवंत शेतमालाचे काढणीपश्‍चात...
शेतमाल प्रक्रिया उद्योगातून मिळाला...नांदेड जिल्ह्यातील बहाद्दरपुरा (ता. कंधार) येथील...
कुक्कुटपालनातून मिळाली स्वयंपूर्णतापरिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन वळके...