agriculture news in marathi, chief minister take a review of flood situation, sangli, maharashtra | Agrowon

मदतीबाबत प्रशासकीय यंत्रणेची चौकशी करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टीम अॅग्रोवन
रविवार, 11 ऑगस्ट 2019

सांगली  : ब्रह्मनाळ येथील दुर्घटना दुर्दैवी असून तेथे तहसील कार्यालय अपयशी ठरले का, याची माहिती मागविण्यात आलेली आहे. पूरस्थितीत मदत देण्यास प्रशासकीय यंत्रणा कमी पडली आहे का याचीही मी स्वत: चौकशी करणार आहे. त्यामध्ये कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करणार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सांगली  : ब्रह्मनाळ येथील दुर्घटना दुर्दैवी असून तेथे तहसील कार्यालय अपयशी ठरले का, याची माहिती मागविण्यात आलेली आहे. पूरस्थितीत मदत देण्यास प्रशासकीय यंत्रणा कमी पडली आहे का याचीही मी स्वत: चौकशी करणार आहे. त्यामध्ये कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करणार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सांगली येथे शनिवारी (ता. १०) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महापूर आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी उपस्थित होते.

यावेळी श्री. फडणवीस म्हणाले, की सांगलीमध्ये २००५ मध्ये पूर आला त्यावेळी ३१ दिवसांत २१७ टक्के पाऊस झाला होता. परंतु २०१९ मध्ये ९ दिवसांत तिप्पट म्हणजे ७५८ टक्के पाऊस झाला आहे. कृष्णा, पंचगंगा, कोयना अशा एकत्रित विसर्गामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. महापुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ९३ बोटी काम करत आहेत. १०१ गावांमधील २१,५०० कुटुंबे आणि १ लाख ४३ हजार लोक विस्थापित आहेत. केंद्र सरकारची पूर्ण मदत मिळते आहे. सांगलीवाडीत हेलिकॉप्टरने अन्न पाकिटे दिली जात आहेत. परंतु अन्न खराब होत असल्याने बोटीच्या मदतीने अन्न पाकिटे देण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

आजघडीला जेथे महापुराचे पाणी आले आहे ते गृहीत धरून नव्याने पूरनियंत्रण रेषेचा आराखडा तयार करावा लागेल. तसे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. कर्नाटक शासनाचे महाराष्ट्राला चांगले सहकार्य असून त्यांनी त्यांच्या राज्यात पूरस्थितीचा धोका पत्करून सध्या पाच लाख तीन हजार क्युसेक विसर्ग सुरू ठेवलाय. त्यामुळे कृष्णेची पातळी उतरण्यास प्रारंभ झाला आहे. नजीकच्या ४८ तासांत पाणीपातळी निश्चितपणे कमी होईल. पूरग्रस्तांना याआधी २ ते ४  हजार रुपयांची मदत मिळत होती. आता १२ ते १५ हजार रुपये देण्यात येणार आहे. ज्यांना रोखीने मदत देण्याची गरज आहे, त्यांना रोखीने मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तसे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहेत. कर्नाटकमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पूरस्थितीचे राजकारण करू नये. विरोधी पक्षनेत्यांनी सूचना कराव्यात, इतर वेळी राजकारण करावे, असा त्यांनी विरोधकांना चिमटा काढला.

मागणीकडे मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी सकाळी हिराबाग कॉर्नर येथे पूरस्थिती पाहण्यासाठी गेले. दरम्यान सांगलीवाडीतील नागरिक येथे दाखल झाले. ‘आम्ही सांगलीवाडीत राहतोय, नावेतून आमच्याकडे चला, आमची परिस्थिती पाहा’ अशी मागणी त्यांनी केली, परंतु या मागणीकडे मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केले. 
 
मुख्यमंत्री म्हणाले...

  • शेतातील गाळ काढण्यासाठी प्रति हेक्टर १३ हजार रुपये देणार.  
  • खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी ३८ हजार रुपये देणार.
  • वाहून गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये देणार.
  • सांगली जिल्ह्यातील २७ हजार ४६७ हेक्टरवरील पिके बाधित.
  • मदत करणाऱ्यांनी गावं दत्तक घ्यावीत.
  • सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत प्रत्येकी १०० डॉक्टरांची टीम पाठवणार.
  • जनावरांच्या नुकसानीबाबत ३० हजार रुपयांची मदत देणार.

इतर ताज्या घडामोडी
पेरणीसाठी ‘बीबीएफ’ तंत्राचा वापर करा :...औरंगाबाद : ‘‘बीबीएफ टोकण यंत्राचा वापर वेगवेगळी...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंका पीक...जळगाव ः केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
हतनूर धरणाची साठवण क्षमता घटलीभुसावळ, जि. जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख सिंचन...
शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा...जालना  : ‘‘शेतकऱ्यांनी शेतीत आधुनिक...
रिसोड बाजार समितीत हळदीची दोन दिवस खरेदीअकोला ः गेल्या काही वर्षांत वाशीम तसेच अकोला...
खानदेशात सर्वदूर पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात पेरणी ८८ टक्‍क्‍यांवर पोचली असून...
परभणीत २५ हजारांवर शेतकऱ्यांची कापूस...परभणी  : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
रत्नागिरी जिल्ह्यातील भाजीपाला,...रत्नागिरी : कोरोना टाळेबंदीत जिल्ह्यातील महिला...
सांगली जिल्ह्यात पावसाअभावी पेरणी वाया...सांगली : जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून...
नगर जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर पेरानगर ः यंदा रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्रांमध्ये...
परभणी जिल्ह्यात ७४.४३ टक्के पेरणीपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात शुक्रवार...
अकोला जिल्ह्यात पीक कर्जापासून ५२ टक्के...अकोला ः खरीप हंगामाला सुरुवात झाली असून,...
पाऊस नसल्याने संरक्षित पाण्यावर भातलागवडनाशिक : जिल्ह्यातील अतिपर्जन्य छायेखालील इगतपुरी...
बियाणे भरपाई दिलेल्या शेतकऱ्यांची नावे...नागपूर ः आपल्या सत्ताकाळात निकृष्ट बीटी...
जळगाव, धुळ्यात युरियाची टंचाई कायमधुळे ः जळगाव व धुळे जिल्ह्यांत युरियासह १०.२६.२६...
महाजॉब्स संकेतस्थळाच्या माध्यमातून...मुंबई : देशातील सर्वात मोठे प्लाझ्मा सेंटर असो की...
केंद्राकडून शेतकऱ्यांच्या मानगुटीवर पाय...कऱ्हाड, जि. सातारा ः अर्थव्यवस्थेला शेतकरी राजा...
करमाळ्यातील आदिनाथ कारखाना...करमाळा, जि. सोलापूर : करमाळा तालुक्‍यातील आदिनाथ...
हॉटेल्स, लॉज उद्यापासून सुरू होणारमुंबई : तब्बल साडेतीन महिन्यांनंतर ८ जुलैपासून...
जनहितचे धरणे अन् तत्काळ शेतकऱ्यांच्या...सोलापूर  ः मोहोळ तालुक्यातील ऑक्टोबर -...