ईव्हीएममध्ये नव्हे, विरोधकांच्या डोक्यात बिघाड ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

फुलंब्री, जि. औरंगाबाद  : विरोधक नेहमीच ईव्हीएम मशिनवरून आक्रमक होतात, मात्र ईव्हीएममध्ये बिघाड नसून विरोधकांच्या डोक्यात बिघाड झाला असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

फुलंब्री येथे बुधवारी (ता. २८) महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी श्री. फडणवीस बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे या वेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की मागील पंधरा वर्षे काॅंग्रेसची सत्ता आली तेव्हा ईव्हीएम चांगले होते. मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासूनच ईव्हीएममध्ये बिघाड कसा असू शकतो? सुप्रिया सुळे निवडून आल्या तेथे ईव्हीएम चांगले अन् इथे रावसाहेब दानवे निवडून आले तर ईव्हीएममध्ये बिघाड झाला म्हणून ओरड विरोधक करीत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नाही. ज्या पक्षाचा अध्यक्षच राजीनामा देतो त्या पक्षाची आणखी दुर्दशा काय असू शकते.

आमच्या महाजनादेश यात्रेला मैदान पुरत नाही, काँग्रेस राष्ट्रवादीचा मंडपही भरत नाही अशी शोकांतिका काँग्रेस राष्ट्रवादीची आहे. काँग्रेसने १५ वर्षांत शेतकऱ्यांना २० हजार कोटी रुपये दिले, तर भाजपने केवळ पाच वर्षांत ५० हजार कोटी शेतकऱ्यांना दिले असल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केला.

भाजपने महाजनादेश यात्रा सुरू केल्याचे पाहून राष्ट्रवादीनेही एक यात्रा सुरू केली. महाजनादेश यात्रेत हजारोंच्या संख्येने लोकांची गर्दी होत आहे तर राष्ट्रवादीची प्रेत यात्रा असून, त्या यात्रेत कोणीही जायला तयार नसल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी केले. तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com