agriculture news in Marathi chief minister took review of flood condition Maharashtra | Agrowon

मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा आढावा 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 जुलै 2021

गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता.२२) आढावा घेतला.

मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता.२२) आढावा घेतला. हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात रेड व ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने  या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. 

या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव लाभक्षेत्र अजय कोहिरकर, विजय गौतम, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कोकण विभाग जलसंपदा मुख्य अभियंता श्री. तिरमणवार आदींची उपस्थिती होती.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  या वेळी सर्व यंत्रणांनी पुढील इशारा लक्षात घेऊन सावधपणे व काळजीपूर्वक काम करावे. कोविड  रुग्ण असतील त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या. या वेळी मुख्य सचिवांनी एनडीआरएफच्या तुकड्या, स्थानिक पोलिस व अग्निशमन दलाचे जवान, सागरी तटरक्षक जवान हे स्थानिक नागरिकांची मदत घेऊन काम करीत आहेत अशी माहिती दिली. 


इतर ताज्या घडामोडी
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...
‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२...
‘मांजरा’ ४२ वर्षांत पंधरा वेळा भरलेलातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या...
परभणी : ‘ई-पीक पाहणी’वर ७७ हजार...परभणी ः ‘‘ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे यंदाच्या...
पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात...
साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस...
बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले...बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित...
नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे...नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा...
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार...
अकोला : पावसामुळे सोयाबीन, कापूस...अकोला : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर या भागात...
नागपुरात पीक नुकसानीचे  पंचनामे सुरू...नागपूर : गेल्या काही दिवसांत नागपूर जिल्ह्यात...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
शेतीमाल, दुग्धजन्य पदार्थ निर्यात...पुणे : कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात...
बुडताना दिसले अन् काही क्षणांत दिसेनासे...वरुड, जि. अमरावती : डोळ्यांसमोर सारे बुडताना दिसत...
‘जनधन’मुळे मदत गरजूंपर्यंत : केंद्रीय...औरंगाबाद : जनधन, आधार आणि बँक खात्याशी मोबाईल...
पूर्वसूचना अर्ज भरण्यासाठी निलंग्यात...निलंगा, जि. लातूर : ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीस...
शेतकऱ्यांसाठी महावितरणने हप्ते बांधून...पुणे : कोरोनामुळे महावितरण कंपनीवरही आर्थिक ताण...