agriculture news in marathi Chief Minister Uddhav Thackeray Discussion with Sarpanchs of Coronafree villages | Page 3 ||| Agrowon

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोरोनामुक्त गावांच्या सरपंचांशी चर्चा

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 जून 2021

परभणी / हिंगोली : कोरोनामुक्त गाव या स्पर्धेच्या अनुषंगाने राज्यातील असंख्य ग्रामपंचायतींनी अभिनव संकल्पना राबविल्या. व्हॉटस् ॲपसारख्या सोशल मीडियाचा उपयोग करून गावात कोरोना येऊ नये यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन नवीन मापदंड निर्माण केला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरपंच आणि ग्रामस्थांचा गौरव केला.

परभणी / हिंगोली : कोरोनामुक्त गाव या स्पर्धेच्या अनुषंगाने राज्यातील असंख्य ग्रामपंचायतींनी अभिनव संकल्पना राबविल्या. व्हॉटस् ॲपसारख्या सोशल मीडियाचा उपयोग करून गावात कोरोना येऊ नये यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन नवीन मापदंड निर्माण केला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरपंच आणि ग्रामस्थांचा गौरव केला.

कोरोनामुक्त गावांसाठी अभिनव प्रयोग राबविणाऱ्या परभणी जिल्ह्यातील खादगाव (ता. गंगाखेड), हिंगोली जिल्ह्यातील मेथा (ता. औंढा नागनाथ) येथील सरपंचांशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. ११) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. 

या वेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे,राज्यमंत्री अब्दुल सत्तार,आदर्श सरपंच पोपटराव पवार, जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे (परभणी), राधाबिनोद शर्मा (हिंगोली) आदी सहभागी झाले होते.

खादगावच्या सरपंच सावित्रीबाई राजेश फड म्हणाल्या, ‘‘कोरोनाच्या काळात बहुसंख्य शेतकरी शेती कामात व्यस्त असल्यामुळे एकप्रकारे ते विलगीकरणच ठरले. त्यामुळे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना चोखपणे राबविता आल्या.’’ 

मेथा येथील सरपंच सारिका आणेकर म्हणाल्या, ‘‘गावामध्ये ग्रामस्तरीय कोरोना जनजागृती पथके  तसेच गावातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तीची कोविड टास्क फोर्स कमिटी स्थापन करण्यात आली. जिल्हा परिषद शाळेत विलगीकरण कक्ष स्थापन केला. लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर केले. शिबिरांद्वारे गावातील ९७ टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले.’’ 
 


इतर ताज्या घडामोडी
उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनमध्ये शंखी...बेलकुंड, जि. उस्मानाबाद जिल्ह्यात : बेलकुंड (ता....
नांदेडमध्ये नुकसानीचे पंचनामे करण्याचे...नांदेड : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच सततच्या...
खानदेशात सोयाबीन पेरणीत घटजळगाव : खानदेशात यंदा नापेर क्षेत्र यंदा वाढणार...
खानदेशात कापसाची आठ लाख हेक्टरवर लागवडजळगाव ः  खानदेशात कापूस प्रमुख पीक आहे. यंदा...
भीमा-नीरा नदी काठांवरील गावांनी सतर्क...सोलापूर : ‘‘भीमा-नीरा खोऱ्यात होत असलेल्या...
मराठवाड्यात पाऊस कायम; जोर कमीऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. २३)...
नाशिक जिल्ह्यात खासगी पशुसेवकांचे काम...येवला : खासगी पशुसेवक ग्रामीण भागात मोठ्या...
मुगावर ‘लिफ क्रिंकल’ प्रादुर्भावअकोला : गेल्या हंगामात लिफ क्रिंकल विषाणूजन्य...
परभणी जिल्ह्यात मोठ्या, मध्यम...परभणी ः पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला....
लिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ...सद्यःस्थितीत आंबिया बहराची फळे ही विकसनशील...
नीरा देवघर धरणक्षेत्रात सर्वाधिक २५५...पुणे : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम पट्यात...
‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर...पुणे ः साखर उद्योगाचा गाळप हंगाम यंदा आव्हानात्मक...
विमा लाभापासून शेतकऱ्यांना वंचित...नगर : नैसर्गिक आपत्ती, अन्य कारणाने नुकसान होऊनही...
साताऱ्यात पावसाचा जोर कमी झालासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट...
केळी उत्पादकांना वादळ नुकसानभरपाईची...अकोला : जिल्ह्यात अकोट तालुक्यात १५ मे २०२० रोजी...
अतिवृष्टिग्रस्तांना अन्नधान्य,...नाशिक : आपत्तीग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदत म्हणून...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होत असून, उत्तर...
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...