डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन 

मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार प्रज्ञासूर्य, विश्ववंद्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १२९ वी जयंती. या निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (ता. १३) मातोश्री निवासस्थानी भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ. आंबेडकर यांचा राष्ट्राला एकसंध ठेवण्याचा मूलमंत्र जतन करणे ही त्यांना आदरांजली ठरेल, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी अभिवादन संदेशात नमूद केले आहे.
Chief Minister's Greetings for Dr. Ambedkar's Birth anniversary

संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांचा बाबासाहेबांनी अखंडपणे पाठपुरावा केला. माणसाच्या जगण्यातल्या सामान्यांतील सामान्य गोष्टींबाबत डॉ. आंबेडकर यांचा अभ्यास होता. त्यांचे त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच चिंतन केले. त्यामुळे त्यांच्या सामाजिक, राजकीय, धर्म, संविधान, आर्थिक, शिक्षण, कृषिसिंचन, कष्टकरी-कामगारांचे हक्क, महिलांचे सक्षमीकरण अशा सर्वस्पर्शी विचारांना जगभरात मान्यता मिळाली. आजही त्यांच्या या व्यासंगी मांडणीचा अभ्यास सुरूच आहे, ही त्यांच्या विचारांची ताकद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या राष्ट्राची अमूल्य अशी संपत्ती आहे. अशा या महाराष्ट्र पुत्राचा सार्थ अभिमान आहे. त्यांचा वैचारिक ठेवा आपल्यासाठी आयुष्यभरासाठी मार्गदर्शक शिदोरी आहे. आधुनिक राष्ट्रनिर्मितीतील त्यांच्या योगदानासाठी कृतज्ञच राहायला हवे. विविधतेने नटलेल्या आपल्या राष्ट्राला एकसंध ठेवण्यासाठीचा त्यांचा मूलमंत्र जतन करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. 

दरम्यान, ‘कोरोना’चे संकट असल्याने  राज्य शासनाच्या आवाहनानुसार घराबाहेर न पडता डिजिटल जयंती साजरी करण्यात आली. तसेच माध्यमांमधूनही विविध कार्यक्रमांचे प्रसारण करण्यात आले होते. त्याचबरोबर सोशल मीडियावर ही जयंतीनिमित्त शुभेच्छा संदेश देण्यात आला. तसेच घराघरात प्रतिमांचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com