agriculture news in Marathi chief secretary visited to Jaykwadi dam Maharashtra | Agrowon

मुख्य सचिवांची `जायकवाडी`ला भेट

टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी पैठण येथील प्रसिद्ध जायकवाडी धरणास शनिवारी (ता. १२) भेट दिली. 

औरंगाबाद  : राज्याचे मुख्य सचिव  संजय कुमार यांनी पैठण येथील प्रसिद्ध जायकवाडी धरणास शनिवारी (ता. १२) भेट दिली. यावेळी त्यांनी धरणाच्या साठ्याविषयी व पुढील दोन वर्षाच्या संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी धरण कसे उपयोगी पडते याविषयीची माहिती गोदावरी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक एन. शिंदे यांच्याकडून जाणून घेतली. 

यावेळी त्यांनी धरणाच्या साठ्यास विधीवत नारळ अर्पण केले. श्री. शिंदे यांनी पूरनियंत्रण करताना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याचे नियमन करण्यासाठी वापरण्यास येणाऱ्या वायरलेस यंत्रणा कार्यवाहीची माहिती मुख्य सचिव यांना दिली. त्यानंतर मुख्य सचिव संजय कुमार व प्रसिद्ध वास्तुविशारद श्री. दास यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पैठण येथील विख्यात संत ज्ञानेश्वर उद्यानाची नूतनीकरण व आधुनिकीकरणाच्या अनुषंगाने पाहणी केली. 

यावेळी राज्याचे फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे व राज्याचे जलपसंपदा सचिव नागेंद्र शिंदे, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, मुख्य अभियंता (लाभक्षेत्र) दिलीप तवार उपस्थित होते. श्री. कुमार आणि श्री. दास यांनी उद्यानाची पाहणी केली. 

यावेळी मुख्य सचिव म्हणाले, उद्यानाला वृक्षांच्या स्वरुपात मोठ्या प्रमाणात निसर्ग संपत्ती लाभली आहे. या संपत्तीचा उपयोग होणे गरजेचे आहे. यासाठी लवकरच विकास आराखडा बनविणे आवश्यक आहे. राज्याचे फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी उद्यानाचा विकास झाल्यास कशाप्रकारे पर्यटनाला चालना मिळेल याविषयी मार्गदर्शन केले.  


इतर अॅग्रो विशेष
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
ढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...
सांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर सांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू...
पीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान...पुणे ः राज्याच्या काही भागात अतिवृष्टी, पुराने...
कोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही...
तेवीस वर्षीय युवकाची पोल्ट्रीत दमदार...शिवपूर (जि. अकोला) येथील शुभम महल्ले या तरुणाने...
शेतीसह डाळी, बेसन पीठ प्रक्रिया ठरली...करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुधीर...
शेतकऱ्यांच्या प्रश्नी संसद दणाणली;...नवी दिल्ली ः संसदेत गुरुवारी (ता.२२) शेतकरी...
‘शेतकरी संसदे’त कृषी कायद्यांवर हल्लाबोलनवी दिल्ली  : जंतर-मंतर येथे संयुक्त किसान...
महाबळेश्वरात ४८० मिलिमीटर पाऊस !!!सातारा ः महाबळेश्वरात मुसळधार पाऊस सुरू आहे....
रत्नागिरीत पावसाचे थैमानरत्नागिरी ः जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारख्या...
‘मुळशी’च्या पाणलोट क्षेत्रात ३७०...पुणे ः जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीरसिंधुदुर्गनगरी ः जिल्हयात मध्यरात्रीपासून...
मराठवाड्यात तब्बल ७७ मंडलात अतिवृष्टी औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता.२२)...
सोमवारपर्यंत ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा...पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोकणासह, मध्य...
राज्यात अतिवृष्टीने दाणादाण पुणे : कोकणातील सर्वंच जिल्ह्यांसह राज्यातील काही...
राज्याची कृषी विधेयके लोकाभिप्रायासाठी...पुणे ः महाविकास आघाडी सरकारने नव्या कृषी...
लॉन’ शेतीत मिळवली चांदे गावाने ओळखपुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रसिद्ध...