agriculture news in marathi Chikalthana Silk Cocoon center gets green signal | Agrowon

औरंगाबादेत होणार अंडीपुंजनिर्मिती केंद्र

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा
रविवार, 24 जानेवारी 2021

चिकलठाणा येथे अंडीपुंजनिर्मिती केंद्राची स्थापना करण्यासाठीच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याने केंद्र उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

औरंगाबाद : रेशीम शेती व उद्योगाला चालना देण्यासाठी औरंगाबाद शहरालगतच्या चिकलठाणा येथे अंडीपुंजनिर्मिती केंद्राची स्थापना करण्यासाठीच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याने केंद्र उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. पायाभूत सुविधांची निर्मिती व सुविधांचे बळकटीकरण या निधीतून करण्यात येणार आहे.

या केंद्रामध्ये अंडीपुंजनिर्मिती केंद्राच्या इमारतीसह प्रशासकीय इमारत, कोल्ड स्टोअरेज, कर्मचारी निवासस्थाने, चॉकी संगोपन केंद्र, कीटक संगोपन केंद्र व शेतकरी निवास प्रशिक्षण केंद्र आदी सोयीसुविधा उभारण्यात येणार आहेत. राज्यात रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांना अंडीपुंजाचा तुटवडा भासू नये. अंडीपुंज उत्पादनाबाबत महाराष्ट्र स्वयंपूर्ण व्हावे म्हणून निर्मिती केंद्र, शेतकरी प्रशिक्षण केंद्र व सोयी सुविधांच्या निर्मितीसाठी २७ कोटी खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव संचालक रेशीम यांनी सादर केला होता. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने छाननी अंति २१ कोटी ७३ लाख ४६ हजार रुपये निधीस सहमती दर्शवली होती. 

या प्रकल्पाच्या बांधकामावरील खर्च १५ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याने नियोजन विभागाच्या ११ जून २०१८ रोजीच्या शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार हा प्रस्ताव सचिव समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. या बैठकीत सचिव समितीने औरंगाबाद येथे प्रस्तावित अंडीपुंजनिर्मिती केंद्रासाठी मुबलक पाणी, मलबेरी लागवडीसाठी पोषक, वातावरण तसेच अशा पद्धतीचा प्रकल्प सद्यःस्थितीत कार्यरत असणाऱ्या कृषी विद्यापीठांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविता येईल का, याबाबत खातरजमा करून आवश्यकता असल्यास फेरप्रस्ताव सचिव समितीस सादर करावा, अशी सूचना केली होती. त्या अनुषंगाने चिकलठाणा (जि. औरंगाबाद) येथील अंडीपुंजनिर्मिती केंद्र उभारण्याच्या प्रस्तावास केंद्रीय रेशीम मंडळ बंगळूर यांच्या व्यवहार्यता अहवालाच्या अधीन राहून समितीने मान्यता दिली आहे. 

पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याशिवाय रेशीम उद्योगाला चालना देणे अशक्य. अंडीपुंजनिर्मिती केंद्र व इतर सोयीसुविधा उभारणीचा मार्ग मोकळा होणे हा रेशीम उद्योगात मैलाचा दगड ठरेल.
- दिलीप हाके, 
उपसंचालक रेशीम, औरंगाबाद


इतर अॅग्रो विशेष
दावा अन् वास्तवशेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या...
थंडीचा प्रभाव घटण्यास प्रारंभ पुणे ः अरबी समुद्राच्या परिसरात चक्रीय स्थिती...
केंद्र सरकारकडून ‘पीजीआर’ला मान्यता पुणे : शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जैव उत्तेजकांना...
बत्तीसशे चौरस फुटांपर्यंतच्या ...मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२००...
स्वच्छता, पायाभूत सुविधांमध्ये...पिण्याचे पाणी, वीज, रस्ते यांसारख्या पायाभूत...
एकत्र या अन् ठरवा भावसातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला कोबीला...
अद्ययावत ‘मंडी’चे स्वप्न!दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस...
राज्यात ७ कोटी ९७ लाख क्विंटल साखरेचे...नगर ः राज्यात यंदाही उसाचे जोरदार गाळप सुरू आहे....
‘लम्पी स्कीन’मुळे दूध उत्पादनाला...नगर ः ‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या...
राज्यात चार नवे कृषी संशोधन प्रकल्पपुणे : राज्यातील कृषी शिक्षण व संशोधनाला चालना...
वंचित शेतकऱ्यांसाठी राज्यांनी पुढाकार...पुणे : ‘‘आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील...
राज्यात थंडीत किंचित वाढपुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात आकाश निरभ्र...
रत्नागिरी हापूस पोहोचला लंडनलारत्नागिरी ः लंडनस्थित भोसले एंटरप्रायझेस यूके आणि...
रब्बी ज्वारीचा हुरडा वाण विकसितपरभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
डोंगरगावात फळपीक केंद्रित प्रयोगशील...नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील...
आगाप नियोजनातून आंब्याला उच्चांकी दरकोकणातील काही आंबा बागायतदार आगाप (हंगामपूर्व)...
५० वर्षांच्या वृक्षाचे पर्यावरणीय मूल्य...साधारणतः आपण कुठल्याही वस्तूचे मूल्यमापन विविध...
कोकणात ढगाळ वातावरण पुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात चक्रिय...
उन्हाळ कांद्याची बाजारात ‘एन्ट्री’ नाशिक : जिल्ह्यात रब्बी हंगामातील आगाप उन्हाळ...
‘पीएम-किसान’मध्ये महाराष्ट्राचा डंका पुणे : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत (पीएम-...