चिमुकल्यांनी दिले खाऊचे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीला 

अमरावती ः तिवसानजीकच्या पूर्णानगर येथील शिरभाते कुटुंबातील चिमुकल्या भावंडांनी खाऊच्या पैशातून जमा झालेले ११ हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे हा निधी देण्यात आला.
children donate money to the Chief Minister's Assistance Fund

पूर्णानगर येथील पंकज शिरभाते यांच्या स्वराली व स्वरित यांना दोन मुले आहेत. पत्नीचे कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने निधन झाल्यावर पंकज शिरभाते यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी खंबीरपणे सांभाळली व मुलांवर उत्तम संस्कार केले. त्या चिमुकल्यांनी आपल्या खाऊच्या पैशातून गोळा झालेले ११ हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले. 

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी या निधीचा विनीयोग होणार आहे. चिमुकल्या भावंडांची ही संवेदनशीला कौतुकास्पद आहे, अशी प्रतिक्रिया महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी व्यक्‍त केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com