agriculture news in Marathi, chili crop in last stage, Maharashtra | Agrowon

मिरची पीक अंतिम टप्प्यात

टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 मार्च 2019

जलसंकट मागील महिन्याच्या सुरवातीलाच वाढले. यामुळे पिकातील प्रतिकारक्षमता कमी झाल्याने भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. आजघडीला नंदुरबार जिल्ह्यातील पीक जवळपास संपले आहे. 
- आर. एम. पाटील, तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोळदा, जि. नंदुरबार

नंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार म्हणून ओळख असलेल्या नंदुरबारमधील मिरची पिकातील काढणी जवळपास आटोपली आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाईमुळे मागील महिन्यातच पीक काढून फेकण्याची वेळ आली होती. 

सुमारे तीन हजार हेक्‍टरवर मिरचीची लागवड जिल्ह्यात मागील जून महिन्यात झाली होती. ऑगस्टपासून काढणी सुरू झाली. या हंगामात सुरवातीला अनुकूल वातावरण राहिल्याने काढणी बऱ्यापैकी झाली. नंतर पावसाने पाठ दिल्याने आवर्षणप्रवण भागात पीक संकटात  सापडले. नंदुरबार तालुक्‍यातील कोठली, पळाशी, कोळदे, लहान शहादे, बामडोद, धमडाई, पथराई, शिंदे, पाचोराबारी आदी ३२ गावांमध्ये जलसंकट वाढल्याने जानेवारीतच पीक काढून फेकण्याची वेळ आली.

कमी पाण्यामुळे पिकातील प्रतिकारक्षमता कमी झाली. भुरी रोगाचा फैलाव जानेवारीत दिसून आला होता, अशी माहिती कोळदा (जि. नंदुरबार) येथील कृषी विज्ञान केंद्रातून मिळाली.

सद्यःस्थितीत पीक जवळपास संपले आहे. ज्यांच्याकडे मुबलक पाणी आहे, त्यांच्याच मिरची पिकात काढणी सुरू आहे. परंतु मोजक्‍याच शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी आहे. नंदुरबार बाजारातील ओल्या लाल मिरचीचे दर यामुळे स्थिर असून, ते २००० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. जानेवारीच्या अखेरपर्यंत रोजची ५५ ते ६० ट्रॅक्‍टर (एक ट्रॅक्‍टर १५ क्विंटल क्षमता) मिरचीची आवक होत होती. परंतु, सध्या ही आवक रोजची १८ ते २० ट्रॅक्‍टरपर्यंत आहे. 

प्रतिक्रिया
आमच्या भागातील मिरची पीक पाण्याच्या समस्येमुळे पूर्णतः संपले आहे. ओल्या लाल मिरचीची आवकही घटली आहे. फक्त गुजरातमधील काही गावांमधून ओली लाल व हिरवी मिरची बाजारात येत आहे. 
- प्रणील पाटील, शेतकरी, पळाशी, जि. नंदुरबार


इतर अॅग्रो विशेष
सक्रिय रुग्णांची संख्या घटली; एका...नवी दिल्ली : कोरोना महामारीविरूद्धच्या...
विदर्भात टोळधाडीची अस्तित्व कायमनागपूर : कृषी विभागाकडून टोळधाड नियंत्रणासाठी...
राज्यातील भाजीपाला लागवड खोळंबली कोल्हापूर: सध्याच्या स्थितीत भाजीपाल्याचे...
राज्यात देशी कोंबडी पिलांना मागणी वाढली नगर ः काही महिन्यांपूर्वी कोरोना आणि चिकनबाबत...
शेतकऱ्यांची खत विक्री दरात फसवणूक करू...बुलडाणा ः या खरीप हंगामात शेतकऱ्यांना रास्त...
राज्यात बेदाण्याचे सव्वा दोन लाख टन...सांगली : यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर ‘कोरोना...
मॉन्सूनची आणखी प्रगती शक्यपुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) मजल...
राज्यात ५८२० पाणी वापर सोसायट्या स्थापन...पुणे  : राज्यातील विविध धरणांच्या क्षेत्रात...
राज्यात आजपासून वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
टोळधाडीचा राजस्थानमधील ९० हजार हेक्टरला...जयपूर, राजस्थान  ः राज्यातील २० जिल्ह्यांतील...
यंदा पायी वारी नाही; दशमीला पंढरीत...पुणे : आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्य शासन...
अरबी समुद्रातून मॉन्सूनची पुढे चालपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाची...पुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
टोळधाडीच्या अस्तित्वाने विदर्भात पसरली...नागपूर   ः टोळधाड मध्यप्रदेशात...
दूध संघांना पेमेंट वाटप सुरुपुणे : राज्यातील दूध संघांनी शेतकऱ्यांना दिलेल्या...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
नाशिक बाजार समिती पुन्हा सुरु;...नाशिक  : नाशिक बाजार समितीत दोन कोरोनाबाधित...
थेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर !परभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...