Agriculture news in marathi, Chili grower Jerry's due to viral disease in cod | Page 2 ||| Agrowon

कोदामेंढीत विषाणूजन्य रोगामुळे मिरची उत्पादक जेरीस

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021

कोदामेंढी, नागपूर  : वातावरणातील बदलामुळे मिरचीच्या शेतांत विषाणूजन्य रोग, तसेच विविध किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच योग्य भाव नसल्याने खर्चाच्या मानाने उत्पादन परवडेनासे झाले आहे. याची दखल घेत कृषितज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांनी तालुक्यातील मिरचीच्या शेतात जाऊन पाहणी केली. 

मौदा तालुक्यात २९०० हेक्टर क्षेत्रांत  मिरची पिकाची लागवड करण्यात आली आहे. वातावरणातील बदलामुळे मिरचीवर चुरडा, मुरडा, मावा, कोळी आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव वाढला. झाडांची वाढ पूर्णपणे खुंटली. त्यामुळे उत्पादनात घट निर्माण झाली. त्यातच परप्रांतात मिरचीला मागणी नसून भाव पाच ते आठ रुपयांवर येऊन ठेपला. त्यामुळे त्रस्त मिरची उत्पादकांनी पीक काढण्यावर भर दिला. 

वातावरणातील सूक्ष्म बदलामुळे मिरचीवर चुरडा मुरडा, मावा, कोळी आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव वाढला. विषाणूजन्य रोग भिवापूर, मौदा आणि भंडारा जिल्ह्यातील पवनी, साकोली, भंडारा या भागातील मिरचीवर देखील आला आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी सांगितलेले उपाय करणे गरजेचे आहे. 
- डॉ. सुधीर बोरकर, कीटकशास्त्रज्ञ, कृषी महाविद्यालय नागपूर. 

पूर्व विदर्भात ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी पाऊस देखील पडला. सध्या या भागात फुलकिड्याला पोषक वातावरण  आहे. वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. 
- डॉ. नंदकिशोर लव्हे, कीटकशास्त्रज्ञ, कृषी महाविद्यालय, नागपूर. 

मिरचीवर फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्याने मौदा तालुक्यात शास्त्रज्ञाची क्षेत्रीय भेट घडवून आणली. प्रत्येक कृषी सहायकामार्फत कृषी वार्ताफलकावर लावण्यात आले व व्हॉट्‌सअॅपद्वारे गावागावांत पोहोचविण्यात आल्या. 
- संदीप नाकाडे, तालुका कृषी अधिकारी, मौदा 

कृषी तज्ज्ञांनी मिरची पिकाचे प्रत्यक्ष निरीक्षण केले आणि उपाययोजना सुचविल्या. त्याचा वापर केल्यास फायदा होईल.
- योगेश देशमुख, जि. प. सदस्य, अरोली कोदामेंढी क्षेत्र. 
 
इतर बातम्या
कोल्हापुरातील १६, तर सांगलीतील चार...कोल्हापूर : कृषी ग्राहकांची चालू व थकीत...
जळगावमधील १७५ गावांमध्ये पाणी योजना...जळगाव : जिल्ह्यातील १७५ गावांचा पाणीप्रश्‍न...
22 तारखेला कुठे होणार पाऊस?20 तारखेला दिवसभर राज्यातले हवामान कोरडे...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
लाळ्या खुरकूत साथीमुळे मलिग्रेत चार...आजरा, जि कोल्हापूर ः मलिग्रे पंचक्रोशीत लाळ्या...
वारणा साखर कारखान्याची निवडणूक...वारणानगर जि. कोल्हापूर : येथील श्री. तात्यासाहेब...
संपादित जमिनीला वाढीव मोबदला द्या अकोला : जिल्ह्यातील पारस येथील औष्णिक विद्युत...
ज्युनिअर आर. आर पाटलांनी कवठेमहांकाळचं...सांगली - संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या...
गडचिरोलीचे हत्ती गुजरातला नेण्याचा घाटगडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागातील अहेरी...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
ईश्‍वेद समूहाच्या टिश्‍युकल्चर ...अकोला : सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेक टिश्‍...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...