नागपूर ः जगाच्या तुलनेत भारताची आणि त्यातही महाराष्ट्राची प्रति हेक्टरी कापूस उत्पादकता
बाजारभाव बातम्या
मिरचीला दराचा तडका
हिरवी मिरची यंदा संपूर्ण हंगामात चांगल्या दराने विकत आहे. मागील आठ-दहा वर्षांतील उच्चांकी दर यंदा उत्पादकांना मिळत आहेत.
अकोला ः हिरवी मिरची यंदा संपूर्ण हंगामात चांगल्या दराने विकत आहे. मागील आठ-दहा वर्षांतील उच्चांकी दर यंदा उत्पादकांना मिळत आहेत. दुसरीकडे अतिपावसाने मोठे नुकसान झाले असून, उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत घसरलेले आहे. याची खंत उत्पादकांना अधिक वाटते आहे.
हिरव्या मिरचीचे पीक दरवर्षी पावसाळ्यात रोख पैसे मिळवून देते. त्यामुळे काही शेतकरी वर्षानुवर्षे मिरची लागवडीला प्राधान्य देत असतात. यंदा सतत पाऊस झाल्याने मिरचीला फटका बसला. अनेकांना सततच्या पावसामुळे लावलेली मिरची उपटून फेकावी लागली. ज्यांनी पीक जोपासले त्यांच्या उत्पादनात घट झालेली असतानाच, दुसरीकडे दर मात्र तुलनेने चांगले मिळाले. यंदाचा हंगाम सुरू झाला तेव्हा मिरचीची सरासरी ७० ते ८० रुपये किलोने विक्री झाली. किलोला ६० रुपये दर तर अनेक दिवस मिळत होता. आताही बाजारात मिरची ४० ते ५० रुपये किलो दराने विकत आहे.
दरवर्षीचा अनुभव पाहता मिरचीचे उत्पादन अधिक व्हायचे. परंतु दर १० रुपयांपासून २० रुपयांच्या आत शेतकऱ्यांच्या हातात पडायचा. कधीकधी याहीपेक्षा कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना मिरची तोडायलाही जड व्हायची. यंदाची स्थिती उत्पादन कमी मात्र, दर अधिक अशी आहे. त्यामुळे तुलनेने हा हंगाम मिरची उत्पादकांसाठी फायदेशीर ठरला आहे. आता तर मिरचीची लागवड अधिक होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. आता सणासुदीचे दिवस सुरू झाल्याने मिरचीची मागणी वाढली आहे.
प्रतिक्रिया
आम्ही २००३ पासून मिरचीचे पीक घेत आहोत. यंदा मिळालेला दर यापूर्वी कधी मिळाल्याचे आठवत नाही. आमची मिरचीची अकोला बाजारात सर्वाधिक १०० रुपयांपर्यंत विक्री झाली. आताही बाजारात परवडणारा दर आहे. पावसामुळे मिरची व्यवस्थापनाचा खर्च वाढला, तरी भाव मिळाल्याने मोठे समाधान आहे.
- चेतन पंडागे, मिरची उत्पादक, कानशिवणी जि. अकोला
मी २०१०-११ पासून मिरचीची लागवड करतो. यंदा सारखा दर या काळात कधीच मिळालेला नाही. सुरुवातीला ७० ते ८० रुपये किलो दर भेटला. आताही ५० रुपयांपर्यंत मिरची विकते आहे. उत्पादन कमी तर दर जास्त, यामुळे हे पीक यंदा समाधानकारक बनले.
- हेमंत देशमुख, मिरची उत्पादक, डोंगरकिन्ही ता. मालेगाव जि. वाशीम
- 1 of 65
- ››