सोलापुरात ढोबळी मिरची, टोमॅटो दरात सुधारणा

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात ढोबळी मिरची, टोमॅटोला चांगली मागणी राहिली. त्यांच्या दरातील तेजीही या सप्ताहात टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
Chili, Tomato prices improve in Solapur
Chili, Tomato prices improve in Solapur

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात ढोबळी मिरची, टोमॅटोला चांगली मागणी राहिली. त्यांच्या दरातील तेजीही या सप्ताहात टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात टोमॅटोची रोज ५०० ते ७०० क्विंटल, ढोबळी मिरचीची २० ते ४० क्विंटल अशी आवक राहिली. ढोबळी मिरची, टोमॅटो दोन्हींची आवक स्थानिक भागातूनच झाली. गेल्या महिनाभरापासून त्यांच्या मागणीत आणि दरात सातत्य टिकून आहे. ढोबळी मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ६००० रुपये तर टोमॅटोला किमान ३०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४५०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय गवार, भेंडी यांनाही चांगला उठाव मिळाला. गवारला प्रतिक्विंटलला किमान २००० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ६००० रुपये, भेंडीला किमान ६०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर मिळाला. भाज्यांच्या दरातही पुन्हा तेजी कायम होती.

विशेषतः कोथिंबीर, मेथीला चांगला उठाव मिळाला. भाज्यांची आवक प्रत्येकी १० ते १५ हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. मेथीला शंभर पेंढ्यासाठी ९०० ते ११०० रुपये, कोथिंबिरीला ५०० ते १००० रुपये आणि शेपूला ३०० ते ४०० रुपये असा दर मिळाला. कांद्याला या सप्ताहातही पुन्हा एकदा चांगला दर मिळाला. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर मिळाला.

डाळिंबाचे दरही वधारले डाळिंबाची आवक या सप्ताहातही रोज एक ते दीड टनापर्यंत राहिली. त्याला मागणीही चांगली राहिल्याने डाळिंबाचे दरही काहीसे तेजीत राहिले. डाळिंबाची सर्व आवक स्थानिक भागातूनच झाली. डाळिंबाला प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ८५०० रुपये असा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com