परभणीत ढोबळी मिरची १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल

 Chilli pepper 1500 to 2500 per quintal in Parbhani
Chilli pepper 1500 to 2500 per quintal in Parbhani

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ३१) ढोबळी मिरचीची दहा क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालेभाज्यांमध्ये मेथीच्या १५ हजार जुड्यांची आवक झाली. प्रति शेकड्याला ४०० ते ६०० रुपये दर मिळाले. पालकाची १२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. शेपूची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ८०० ते १२०० रुपये दर मिळाले. चुक्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची १२५ क्विंटल आवक झाली.

प्रतिक्विंटलला ४०० ते १२०० रुपये दर मिळाले. वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. कारल्याची ६ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५०० ते ८०० रुपये दर मिळाले.

काकडीची ५० क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ६००० ते ८००० रुपये दर मिळाले. वाटाण्याची ७० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. गवारीची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५००० ते ७००० रुपये दर मिळाले.

वालाची ८ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला २००० ते २५०० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची २५ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला १००० ते १५०० रुपये दर मिळाले. वांग्यांची ३० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. टोमॅटोची १३०० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेटला ८० ते १५० रुपये दर मिळाले.

हिरव्या मिरचीची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३५०० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ७० क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. कोबीची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४०० ते ६०० रुपये मिळाले. 

भेंडीची १५ क्विंटल आवक

भेंडीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते २५०० रुपये दर मिळाले. बीटरुटची ५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. गाजराची ४०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ७०० ते १२०० रुपये दर मिळाले. लिंबांची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. पेरूची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ८०० ते १५०० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com