नाशिकमध्ये ढोबळी मिरची १८७५ ते २८१० प्रतिक्विंटल

Chilli pepper 1875 to 2810 rupees per quintal in Nashik
Chilli pepper 1875 to 2810 rupees per quintal in Nashik

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळ्या मिरचीची आवक ५० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १८७५ ते २८१० दर होता. सरासरी दर २१९० रुपये मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

बाजारात फळभाज्यांमध्ये वांग्यांची २३६ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ३०० ते २००० असा दर होता. त्यास सरासरी दर १४०० राहिला. फ्लॉवरची आवक ६२७ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १८० ते ३९० दर होता. सरासरी दर २५० राहिला. कोबीची आवक ९९२ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १६५ ते ३७५ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २५० राहिला. 

भोपळ्याची आवक ४६ क्विंटल होती. त्यास प्रतिक्विंटल १३५ ते १००० असा दर होता. सर्वसाधारण दर ४३५ राहिला. कारल्याची आवक ४६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १६७० ते २९६० असा दर होता. दोडक्याची आवक ५१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १४१५ ते २०००; तर सरासरी दर १८७५ राहिला. गिलक्यांची आवक ३९ क्विंटल होती. त्यास प्रतिक्विंटल ८३५ ते १२५० दर होता. सर्वसाधारण दर १०४० राहिला. भेंडीची आवक ६० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १५०० ते २५००; तर सरासरी दर २००० राहिला. 

गवारची आवक १६ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ३५०० ते ५५००; तर सरासरी दर ५००० राहिला. डांगराची आवक ५० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ६०० ते १५००, सरासरी दर १३०० राहिला. काकडीची आवक ८०३ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ६५० ते १५०० असा दर होता. सर्वसाधारण दर ८७५ राहिला. लिंबांची आवक ४० क्विंटल झाली. त्यांना प्रतिक्विंटल ७०० ते १८००; तर सर्वसाधारण दर १५०० राहिला. 

कांद्याची आवक ११९६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ८५० ते २४५०, सर्वसाधारण दर १६०० होता. बटाट्याची आवक २१५० क्विंटल झाली. त्यास ७५० ते १८००; तर सर्वसाधारण दर १४५० होता. लसणाची आवक १५४ क्विंटल झाली. सर्वसाधारण दर ४५० ते ११००० दरम्यान होता. 

डाळिंबांना ५२५० रुपयांचा दर

फळांमध्ये डाळिंबाची आवक ९८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७५० ते ८५०० दर होता. सर्वसाधारण दर ५२५० राहिला. बोरांची आवक २४ क्विंटल झाली. त्यांना ९०० ते १८०० दर मिळाला. सर्वसाधारण दर १५०० राहिला. 

संत्र्यांची आवक १०४ क्विंटल झाली. त्यांना १२०० ते २६०० सर्वसाधारण दर मिळाला. बाजारात होत असलेल्या शेतमालाच्या कमी जास्त अावकेनुसार शेतमालाच्या दरात चढ-उतार झाल्याचे पाहायला मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com