नाशिकमध्ये ढोबळी मिरची २५०० ते ४६२५ रुपये प्रतिक्विंटल

Chilli pepper is available at 2500 to 4625 rupees per quintal in Nashik
Chilli pepper is available at 2500 to 4625 rupees per quintal in Nashik

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळ्या मिरचीची आवक १०६ क्विंटल झाली. त्यांना प्रतिक्विंटल २५०० ते ४६२५ दर मिळाला. सरासरी दर ३२५० रुपये राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

बाजारात वांग्यांची १६८ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १७०० ते ३७०० असा दर होता. त्यास सरासरी दर २५०० राहिला. फ्लॉवरची आवक ३०७ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७२० ते १४२० दर होता. सरासरी दर १०७० राहिला. कोबीची आवक ७१० क्विंटल झाली. तिला सरासरी ४१५ ते ८३० असा दर होता. सर्वसाधारण दर ६२५ राहिले. पिकॅडोरची आवक ३५ क्विंटल झाली. तिला ३७५० ते ४६२५ दर होता. तर, सर्वसाधारण दर ४१८५ रुपये राहिला. 

भोपळ्याची आवक ७०२ क्विंटल होती. त्यास २६५ ते १००० असा दर होता. सर्वसाधारण दर ४६५ राहिला. कारल्याची आवक १३४ क्विंटल झाली. त्यास १६७० ते २९१५ असा दर होता. सर्वसाधारण दर २५०० राहिला. दोडक्याची आवक ३२ क्विंटल झाली. त्यास २५०५ ते ३७५० असा दर होता. त्यास सर्वसाधारण दर २९१५ राहिला. गिलक्याची आवक २१ क्विंटल होती. त्यास २५०५ ते ३३३५ दर होता. सर्वसाधारण दर ३१२५ राहिला. 

हिरव्या मिरचीची आवक ११० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १७६० ते ३००० प्रतिक्विंटल दर होता. सर्वसाधारण दर २४०० राहिला. भेंडीची आवक ४२ क्विंटल झाली. त्यास २९१५ ते ४५०० दर होता. सर्वसाधारण दर ४००० राहिला. गवारीची आवक ८ क्विंटल झाली. तिला ३५०० ते ७००० असा दर होता. सर्वसाधारण दर ६००० राहिला. डांगराची आवक ३२ क्विंटल झाली. त्यास ८०० ते १४०० दर होता. सर्वसाधारण दर १२०० राहिला. काकडीची आवक ७६८ क्विंटल झाली. तिला ७५० ते १७५० असा दर होता.

सर्वसाधारण दर ११०० राहिला. लिंबाची आवक ३० क्विंटल झाली. त्यास ८०० ते १५०० असा दर होता. सर्वसाधारण दर १३०० राहिला.  बटाट्याची आवक २६७० क्विंटल झाली. त्यास १६५० ते २३५० दर होता. सर्वसाधारण दर १९५० होता. लसणाची आवक २६ क्विंटल झाली. त्यांना ८००० ते १६००० रुपये दर मिळाला. कांद्याची आवक १५०५ क्विंटल झाली. त्यास १५०० ते ४८०० प्रतिक्विंटल दर मिळाला.

डाळिंबांना ५०० ते ६५०० रुपये

फळांमध्ये डाळिंबांची आवक २७१ क्विंटल झाली. त्यांना ५०० ते ६५०० रुपये दर होता. केळीची आवक ६० क्विंटल झाली. तिला ५०० ते १००० सर्वसाधारण दर मिळाला. सरासरी भाव ८०० रुपये होता. बोरांची आवक १४० क्विंटल झाली. त्यांना ८०० ते १९०० दर मिळाला. मोसंबीची आवक २५ क्विंटल झाली. तिला २००० ते ४००० सर्वसाधारण दर मिळाला. सरासरी भाव ३००० रुपये राहिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com