परभणीत ढोबळी मिरचीला प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये

परभणीत ढोबळी मिरचीला  प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये
परभणीत ढोबळी मिरचीला प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २५) ढोबळ्या मिरचीची ७ क्विंटल आवक होती. तिला प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची ८ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ३५०० रुपये दर मिळाले. कारल्याची १० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २५०० रुपये दर मिळाले.

गोल भोपळ्याची (देवडांगर) १२ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला ५०० ते १००० रुपये दर मिळाले. काकडीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ६०० ते १२०० रुपये दर मिळाले. वांग्याची ३० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला १५०० ते २००० रुपये दर मिळाले. पालेभाज्यांमध्ये मेथीच्या ६ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा ५०० ते १००० रुपये दर मिळाले. पालकाची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २५०० रुपये दर मिळाले. शेपूची १२ क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर मिळाले. चुक्याची ४ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ३५ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला २५०० ते ५००० रुपये दर मिळाले.

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये चवळीची ५ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. शेवग्याची २ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला ४००० ते ६००० रुपये दर मिळाले. गवारीची ७  क्विंटल आवक झाली. तिला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ६०० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेटला ३०० ते ५०० रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ७० क्विंटल आवक झाली. तिला ७०० ते १५०० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची २५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. कोबीची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १५०० ते २००० मिळाले. 

भेंडीची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले. कंदवर्गीय भाज्यांमध्ये बीट रुटची ३ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला १५०० ते २००० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची ६ क्विंटल आवक झाली. दर २००० ते ३००० रुपये मिळाले. लिंबांची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते २००० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com