राज्यात ढोबळी मिरचीला १००० ते ३००० रूपये

राज्यात ढोबळी मिरचीला १००० ते ३००० रूपये
राज्यात ढोबळी मिरचीला १००० ते ३००० रूपये

पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २९) ढोबळी मिरचीची सुमारे १५ टेम्पो आवक झाली. या वेळी प्रतिदहा किलोला १०० ते १५० रुपये दर मिळाला. सध्या होणारी आवक ही पुणे विभागातील विविध जिल्ह्यांमधून होत आहे. ही आवक सरासरी आवकेच्या जास्त असल्याचे ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी सांगितले.

सोलापुरात सर्वाधिक १७०० रुपये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात ढोबळी मिरचीची आवक अगदीच कमी राहिली. पण तिला मागणी असल्याने दर स्थिर राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात ढोबळी मिरचीची आवक रोज २० ते ४० क्विंटलपर्यंत राहिली. त्यात सातत्याने चढ-उतार राहिला. पण मागणी टिकून होती. मिरचीची आवक स्थानिक भागातूनच झाली. बाहेरील आवक तुलनेने कमी होती. या सप्ताहात ढोबळी मिरचीला किमान ८०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक १७०० रुपये असा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहात किमान ५०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये असा दर  होता. आवक रोज ३० ते ५० क्विंटलपर्यंत राहिली. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात हीच आवक रोज केवळ ३० ते ४० क्विंटलपर्यंत होती. दर किमान ७५० रुपये, सरासरी १३०० रुपये आणि सर्वाधिक १८०० रुपये असे होते. या सप्ताहात त्यात किंचित चढ-उतार राहिला. पण दर टिकून होते. शिवाय मागणीही कायम राहिली. येत्या आठवड्यात आवक जशी कमी होईल, तसे दर वाढतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

परभणीत १५०० ते २००० रुपये

परभणी येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. २९) ढोबळ्या मिरचीची ८ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. सध्या येथील मार्केटमध्ये जालना जिल्हा, कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातून ढोबळ्या मिरचीची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी या मिरचीची ५ ते ८ क्विंटल आवक झाली. त्या वेळी सरासरी प्रतिक्विंटल १५०० ते ३५०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २९) तिची ८ क्विंटल आवक झाली. त्या वेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये मिळाले. किरकोळ विक्री प्रतिकिलो ४० ते ६० रुपये दराने झाली, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

सांगलीत प्रतिदहा किलोला १०० ते २५० रुपये  

सांगली येथील शिवाजी मंडईत गुरुवारी (ता. २९) ढोबळी मिरचीची १५० ते २०० पिशवी (एका पिशवीत १५ किलो) आवक झाली. त्यांना प्रतिदहा किलोस १०० ते २५० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

येथील मंडईत या मिरचीची आवक जिल्ह्यातील आष्टा, वाळवा, तुंग, कवठेपिरान, दुधगाव, समडोळी या भागांतून झाली. परंतु, महापुरामुळे या भागातील शेतीचे नुकसान झाले. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, बेळगाव तसेच जिल्ह्यातील मिरज पूर्व भागातून मिरचीची आवक झाली. 

बुधवारी (ता. २८) ढोबळी मिरचीची १२५ ते २५० पिशव्यांची आवक झाली. त्यांना प्रतिदहा किलोस ११० ते २६० रुपये असा दर मिळाला. मंगळवारी (ता. २७) तिची १५० ते २५० पिशव्या आवक झाली. त्यांना प्रतिदहा किलोस ११० ते २६० रुपये असा दर मिळाला. सोमवारी (ता. २६) १५० ते २५० पिशव्या आवक झाली. त्या वेळी प्रतिदहा किलोस १०० ते २०० रुपयांचा दर मिळाला.  ढोबळी मिरचीची आवक कमी असून दर स्थिर आहेत. पुढील सप्ताहात तिच्या आवकेत किंचित वाढ होईल, पण दर स्थिर राहतील, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

अकोल्यात १५०० ते ३००० रुपये

अकोला येथील जनता भाजी बाजारात हिरव्या ढोबळ्या मिरचीची १५०० ते ३००० रुपये दरम्यान प्रतिक्विंटल विक्री होत आहे. गुरुवारी (ता.२९) येथील बाजारात असा दर मिळाला.

सध्या आवक जास्त नसली तरी दर मात्र १५०० पासून सुरु होत आहेत. दुय्यम दर्जाची मिरची अवघी १५०० ते २२०० दरम्यान विक्री झाली. चांगल्या दर्जाच्या मिरचीला ३००० हजारांचा दर मिळाला. सरासरी विचार करता ढोबळी मिरची २००० रुपये प्रतिक्विंटल विकत आहे. या मिरचीची १०  क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली होती. किरकोळ बाजारात ग्राहकांना ढोबळी मिरची प्रतिकिलो ४० ते ६० रुपयांदरम्यान विक्री केली जात होती. येथील मुख्य बाजारातून मिरची खरेदी करून छोटे व्यापारी खेड्यांच्या बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात मिरची नेत असतात. सध्या मिरचीचे दर फारसे नसून मागणीही कमी असल्याचे सांगण्यात आले. 

हिरव्या ढोबळी मिरचीचे जिल्‍हयात फारसे लागवड क्षेत्र नाही. वाशीम जिल्ह्यात मंगरुळपीर तालुक्यात लागवड बऱ्यापैकी आहे. त्यामुळे येथील आवक ही विविध जिल्ह्यांमधून होत आहे. येत्या काळात थंडीचा जोर जसा वाढेल, तशी आवक कमी होऊ शकते, असे सांगितले. किमान महिनाभर आवक स्थिर राहण्याची शक्यता आहे. यामुळे दरांवर फारसा परिणाम होईल, असे दिसत नसल्याचे व्यापारी सुत्रांकडून सांगण्यात आले.  

नाशिकमध्ये प्रतिक्विंटल  १६२५ ते ३१२५ रुपये नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २८) ढोबळी मिरचीची आवक ११९ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १६२५ ते ३१२५ रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २२५० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंगळवारी (ता. २७) ढोबळी मिरचीची आवक १४९ क्विंटल झाली. तिला १८७५ ते ३१२५ असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २३१० रुपये होता. सोमवारी (ता. २६) आवक १२१ क्विंटल झाली. त्या वेळी ३५०० ते ४५०० प्रतिक्विंटलचा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४००० रुपये राहिले. रविवारी (ता. २५) आवक ९६ क्विंटल झाली. त्या वेळी १७५० ते ३४३० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० रुपये राहिले. 

शनिवारी (ता. २४) ढोबळी मिरचीची आवक ९५ क्विंटल झाली. तिला १६२५ ते ३४४० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २२५० रुपये होता.

शुक्रवारी (ता.२३) तिची आवक १९६ क्विंटल झाली. त्या वेळी २१२५ ते ३१२५ रुपये, तर सर्वसाधारण २५०० रुपये दर मिळाला.

गुरूवारी (ता. २२) ढोबळी मिरचीची आवक १९४ क्विंटल, तर दर २००० ते २६२५ असा मिळाला. सर्वसाधारण २३१० रुपये दर राहिला. मागील आठवड्यापासून बाजार समितीत ढोबळी मिरचीची आवक कमी जास्त होत असल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार दरामध्ये चढ उतार दिसून आला, असे सूत्रांनी सांगितले.

साताऱ्यात २५०० ते ३५०० रुपये

सातारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २९) ढोबळी मिरचीची ९ क्विंटल आवक झाली. तिला क्विंटलला २५०० ते ३५०० असा दर मिळाला. दर स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

जिल्ह्यासह परजिल्ह्यातून ढोबळी मिरचीची आवक होत आहे. मंगळवारी (ता. १३) तिची १७ क्विंटल आवक होऊन तिला क्विंटलला २००० ते ३००० असा दर मिळाला आहे. गुरुवारी (ता. २२) ढोबळी मिरचीची २७ क्विंटल आवक झाली. तिला २५०० ते ३००० असा दर मिळाला आहे. रविवारी (ता. २५) १९ क्विंटल आवक झाली. त्या वेळी तिला क्विंटलला २००० ते ३००० असा दर मिळाला. गुरुवारी (ता. २९) क्विंटलमागे ५०० रुपयांची दरवाढ झाली आहे.

नगरला २ ते ४ हजार रुपये

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दर दिवसाला साधारण ३० ते ४५ क्विंटल ढोबळी मिरचीची आवक झाली. गुरूवारी (ता. २९) ढोबळी मिरचीची ३५ क्विंटलची आवक झाली. तिला प्रति क्विंटलला २ हजार ते ४ हजार रुपयांचा दर मिळाला.  नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत नगर, बीड, लातूर, औरंगाबाद या भागातून ढोबळी मिरचीची आवक झाली. गेल्या पंधरा दिवसांमध्ये दुष्काळी परिस्थितीचा परिणाम म्हणून तिची आवक घटली आहे. तरी साधारण दर दिवसाला ३० ते ४५ क्विंटलची आवक झाली. 

गुरूवारी ढोबळी मिरचीची ३५ क्विंटलची झाली. २२ आॅगस्ट रोजी ४० क्विंटलची आवक झाली, तर १९०० ते ३५०० हजार रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला. १४ ऑगस्ट रोजी २८० क्विंटलची आवक होऊन ३९०० रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला, अशी माहिती बाजा समितीतील सूत्रांनी सांगितली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com