भारतीय सुताचा चीन सर्वांत मोठा खरेदीदार

सुताची मागणी चांगली असल्याने दर स्थिर आहेत. कोम्ब्ड (३०) सुताला सर्वच देशांकडून मागणी आहे. मागील हंगामात दर्जेदार कापूस पुरवठ्यासंबंधी अडथळे असतानाही सूतगिरण्यांनी आपले तंत्रज्ञान, सातत्य यातून चांगले उत्पादन घेतले असून, भारत यंदा जगातिल दुसऱ्या क्रमांकाचा सूत उत्पादन असणार आहे. - दीपकभाई पाटील, अध्यक्ष, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी (शहादा, जि. नंदुरबार)
सुत निर्यात
सुत निर्यात

जळगाव ः चीनने भारतीय रुईसह सुताला पसंतीक्रम कायम ठेवला असून, आयात सुरू ठेवली आहे. अर्थातच चीन यंदा भारतीय सुताचा सर्वात मोठा खरेदीदार ठरण्याची शक्‍यता आहे. यंदा भारतात सुमारे पाच हजार कोटी किलोग्रॅम सुताचे उत्पादन हमखास येईल, अशी स्थिती आहे. सूत निर्मितीसाठी रुईची मागणी चांगली असल्याने रुईचे दर काहीसे वाढले आहेत. रुई व सुताच्या बाजार स्थिर असल्याचे बाजारपेठ विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.  भारतीय टेक्‍सटाईल काउंसिलने जारी केलेल्या माहितीनुसार भारतीने यंदा (२०१७-१८) ३४२४ दशलक्ष डॉलरच्या सुताची निर्यात केली आहे. सर्वाधिक निर्यात चीनमध्ये झाली आहे. यापाठोपाठ बांगलादेश, पाकिस्तानात निर्यात झाली आहे. यातील पाकिस्तान व चीन हे देश भारताचे शत्रू मानले जातात. पण याच देशांमध्ये सर्वाधिक सूत निर्यात झाली आहे. रुईच्या उत्पादनात यंदा भारत जगात पहिल्या क्रमांकाचा देश बनला आहे. तर सुताच्या उत्पादनात चीन भारताच्या पुढे आहे. चीनमध्ये सात हजार कोटी किलो सुताचे उत्पादन झाल्याचा अंदाज आहे. यापाठोपाठ भारतात उत्पादन झाले असून, जगात भारत दुसऱ्या क्रमांकाचा सूत उत्पादक ठरला आहे.  कापूस पुरवठ्यासंबंधी अडचणी असताना भारतात सुताचे उत्पादन यंदा वाढल्याचे समोर आले आहे. एकूण उत्पादनातील ३० टक्के सूत निर्यात एकट्या चीनमध्ये होईल. निर्यात ड्युटी फ्री असल्याने कुठलीही अडचण नाही. गिरण्यांची धडधड सुरू असून, सुताचे दर महिनाभरापासून स्थिर आहेत. कोम्ब्ड (३०) सुताला २०५ रुपये प्रतिकिलोचा दर आहे. सूत मागणी वाढल्याने रुईची गरजही कायम आहे. परिणामी खंडीचे (३५६ किलो रुई) दर ५०० रुपयांनी वधारले आहेत. ४८००० रुपयांपर्यंत खंडीचे दर आहेत. मागील महिन्यात हे दर ४६५०० ते ४७५०० रुपयांपर्यंत होते.  दाक्षिणात्य व उत्तरेकडील कापड उद्योगाला सुताची गरज कायम आहे. कारण मागील हिवाळ्यात उत्तरेकडे कापडासंबंधीचे लघू उद्योग सुरू झाले. प्रतिमहिना २७ लाख गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) सूतगिरण्यांना भासत आहे. सुताचे दर वाढत आहेत. सोबतच रुईलाही मागणी कायम आहे. अशात बाजार स्थिर आहे. डॉलर तेजीत असल्याचा लाभ निर्यातीसंबंधी होत आहे. सध्यातरी सर्वच गिरण्या व्यवस्थित कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.   चीनमध्ये कापूस उत्पादन कमी, पण सूत उत्पादन अधिक चीनमध्ये सरत्या हंगामात सुमारे ३५० लाख गाठी कापूस उत्पादन आले. परंतु चीनकडे ४०० लाख गाठींचा संरक्षित (बफर) साठा होता. यातील गाठींचा वापर तेथील गिरण्यांनी केला. हा साठा संपत असतानाच अमेरिकेकडून (युएसए) आयात वाढविली. अमेरिकेशी व्यापार युद्ध सुरू झाल्यानंतर चीनने भारतीय कापसाचा पर्याय शोधला. सूत व रुईचा मोठा आयातदार देश असल्याने चीनची सूत उत्पादनातील आघाडी कायम ठेवली असल्याचे सांगण्यात आले.   चीनमध्ये कापूस उत्पादन कमी, पण सूत उत्पादन अधिक चीनमध्ये सरत्या हंगामात सुमारे ३५० लाख गाठी कापूस उत्पादन आले. परंतु चीनकडे ४०० लाख गाठींचा संरक्षित (बफर) साठा होता. यातील गाठींचा वापर तेथील गिरण्यांनी केला. हा साठा संपत असतानाच अमेरिकेकडून (युएसए) आयात वाढविली. अमेरिकेशी व्यापार युद्ध सुरू झाल्यानंतर चीनने भारतीय कापसाचा पर्याय शोधला. सूत व रुईचा मोठा आयातदार देश असल्याने चीनची सूत उत्पादनातील आघाडी कायम ठेवली असल्याचे सांगण्यात आले.  सूत उत्पादनातील ठळक बाबी ( कोटी किलोग्रॅम) चीनमधील उत्पादन सात हजार 

भारतीय उत्पादन  पाच हजार 

बांगलादेश सुमारे दोन हजार   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com