agriculture news in marathi China captures Indian space of Rice in African markets | Agrowon

तादंळाच्या आफ्रिकेतील बाजारपेठेवर चीनचा कब्जा; भारताला धक्का

वृत्तसेवा
रविवार, 5 जानेवारी 2020

नवी दिल्ली : तांदळाची आयात करणारा देशच आता निर्यातदार झाल्यामुळे जागतिक बाजारपेठेत भारताला नवा स्पर्धक निर्माण झाला आहे. जगातील सर्वांत मोठा तांदूळ निर्यातदार देश असा बहुमान मिरविणाऱ्या भारतासमोर सध्या चीनने मोठे आव्हान निर्माण केले आहे.

आफ्रिकेतील तांदळाच्या बाजारपेठेतील भारताचा दबदबा मोडून काढत चीनने पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीतील ‘उद्योग भवना’तील धोरणकर्त्यांपासून ते तांदळाची निर्यात करणाऱ्या बड्या मिल मालकांपर्यंत सर्वांचेच धाबे दणाणले आहे.

नवी दिल्ली : तांदळाची आयात करणारा देशच आता निर्यातदार झाल्यामुळे जागतिक बाजारपेठेत भारताला नवा स्पर्धक निर्माण झाला आहे. जगातील सर्वांत मोठा तांदूळ निर्यातदार देश असा बहुमान मिरविणाऱ्या भारतासमोर सध्या चीनने मोठे आव्हान निर्माण केले आहे.

आफ्रिकेतील तांदळाच्या बाजारपेठेतील भारताचा दबदबा मोडून काढत चीनने पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीतील ‘उद्योग भवना’तील धोरणकर्त्यांपासून ते तांदळाची निर्यात करणाऱ्या बड्या मिल मालकांपर्यंत सर्वांचेच धाबे दणाणले आहे.

चीनकडून आतापर्यंत तांदळाची मोठ्या प्रमाणात आयात केली जात होती. मात्र चीनने आपल्याकडील पांढऱ्या तांदळाची मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा पहिला फटका भारताला बसण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील निर्यात विभागातील (कृषी) वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

सरकारी मालकीच्या गोदामांमधून चीनने मागील सहा महिन्यांत ३० दशलक्ष टन एवढ्या मोठ्या प्रमाणात पांढरा तांदूळ निर्यातीसाठी बाहेर काढला आहे. या तांदळाची मुख्यत्वे आफ्रिकेतील देशांना निर्यात केली जाणार आहे. 

साधारणपणे ४०० डॉलर प्रतिटन दराने भारत बिगर-बासमती तांदळाची निर्यात करतो. मात्र यापेक्षा कमी दराने चीनकडून तांदळाची निर्यात केली जात आहे, अशी माहिती उत्तराखंडातील मोठे तांदूळ निर्यातदार असलेल्या लक्ष्य अगरवाल यांनी दिली. चीनकडून निर्यात होणाऱ्या बिगर-बासमती तांदळाचा दर ३०० ते ३२० डॉलर प्रतिटन आहे, असे बाजारपेठेतील सूत्रांनी 
सांगितले.

चीनमध्ये नव्या तांदळाला अधिक पसंती
सामान्यतः चिनी नागरिक नव्या तांदळाला त्याच्या चवीमुळे अधिक पसंती देतात. त्यामुळे चीनमध्ये कायम नव्या तांदळाला मागणी असते. परिणामी, नवा तांदूळ ज्या वेळी बाजारात मोठ्या प्रमाणात येतो, तेव्हा चीन सरकारी गोदामांमधील जुना तांदूळ अतिशय कमी दराने बाजारात आणतो. हा जुना तांदूळ चीनकडून आफ्रिकेला पाठविला जातो. भारत सर्वांत मोठा तांदूळ निर्यातदार आहे. चीनच्या या उद्योगांचा पहिला फटका जागतिक बाजारपेठेबरोबरच भारताला बसतो आहे, अशी माहिती ‘अपेडा’तील सूत्रांनी दिली.

सर्वांत मोठे निर्यातदार देश :  भारत, थायलंड, व्हिएतनाम, पाकिस्तान

भारताची निर्यात (रुपयांत)

  • २०१८  :   १४,०५९.५१ कोटी 
  • २०१९  :   ९,०२८.३४ कोटी

इतर अॅग्रोमनी
जग महामंदीच्या उंबरठ्यावर उभे :...नवी दिल्ली : जागतिक पातळीवर कोविड-१९ च्या...
कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...मुंबई : ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग...
संरक्षण सिद्धतेप्रमाणेच आरोग्य...सार्वजनिक आरोग्य आणि करोना सारख्या गंभीर साथी...
अनेक वर्षानंतर कापसाची विक्रमी खरेदीभारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) अनेक वर्षानंतर...
शेतीमालाचे फ्युचर्स व्यवहार सुरूकोरोनामुळे ‘एनसीडीइएक्स'ने २० एप्रिल च्या...
विमानसेवा बंदचा भाजीपाला निर्यातीला...पुणे : फेब्रुवारी ते मे या काळात युरोपीय...
वेळेवर करा कर्जाची परतफेडसुरवातीच्या काळात उत्पन्न सुरू होईपर्यंतचा...
मध निर्यातीत मोठी वाढनाशिक: भारतात उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक मधाला...
शेतकरी उत्पादक कंपन्या ‘डिजिटल’ होणार;...पुणे : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना डिजिटल...
कुटुंबाच्या अर्थकारणात डाळिंबासह लिंबू...सात एकरांवरील डाळिंब हे मुख्य पीक असले तरी...
देशात साखर उत्पादनात ५७ लाख टनांनी घटकोल्हापूर: देशातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला...
राज्य अर्थसंकल्पातील महत्वाच्या तरतुदीकृषी   महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती...
'फिक्की'च्या राष्ट्रीय परिषदेत जैन...दिल्ली ः इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री...
ऊस, आले पिकासह जमिनीच्या विश्रांतीचे...कोल्हापूर जिल्ह्यातील शेडशाळ (ता. शिरोळ) येथील...
अन्नधान्याचे यंदा विक्रमी उत्पादन नवी दिल्ली: देशात यंदा खरीप हंगामात...
राज्यातील रेशीम बाजारात १० कोटींची...नागपूर ः राज्यात रेशीमकोष खरेदी बाजारपेठेला...
आर्थिक निर्णयांनी वाढवला प्रियंकाताईंचा...पती गौरव काकडे यांच्या आग्रहावरून पुणे शहरातील...
गेल्या वर्षीच्या साखर निर्यातीसाठी...कोल्हापूर : गेल्या वर्षीची (२०१८-१९) साखर निर्यात...
आंतरराष्ट्रीय डाळ परिषदेकडे उद्योजकांचे...पुणे  : जागतिक कडधान्य उत्पादन व बाजारपेठेला...
कच्च्या साखरेच्या दरात उच्चांकी वाढकोल्हापूर : जागतिक बाजारात कच्च्या साखरेच्या दरात...