agriculture news in marathi china faces new 46 corona patient | Agrowon

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक; दिवसात आढळले ४६ नवे रुग्ण

वृत्तसेवा
रविवार, 12 एप्रिल 2020

चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर चीन सरकारने टाळेबंदी हटवण्याचा निर्णय घेतला. यानंतर पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले ४६ रुग्ण आढळून आले असून आणखी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

बीजिंग : चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर चीन सरकारने टाळेबंदी हटवण्याचा निर्णय घेतला. यानंतर पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले ४६ रुग्ण आढळून आले असून आणखी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामधील चार जण चीनमधील रहिवासी आहेत तर उर्वरित सर्व रुग्ण परदेशातून चीनमध्ये दाखल झालेले आहेत. अचानक ४६ नविन रुग्ण सापडल्यानंतर चीनमध्ये पुन्हा कोरोनाची संकट घोंगावत आहे.

चीनमध्ये आढळलेल्या ४६ नव्या रुग्णांपैकी ३४ जण असे आहेत की त्यांच्यामध्ये कोरोना असल्याची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. मात्र, त्यांची चाचणी केल्यावर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. दरम्यान चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानुसार, चीनमध्ये परदेशातून आलेल्या आणि कोरोना बाधित असलेल्या रुग्णांची संख्या आता १ हजार १८३ वर जाऊन पोहोचली आहे. यापैकी ४४९ जणांना उपचारांनंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर, ७३४ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी ३७ जणांची प्रकृती गंभीर आहे.

चीनमध्ये शुक्रवारपर्यंत कोरोना विषाणूमुळे ८१ हजार ९५३ जण आजारी पडले असून. त्यापैकी १ हजार ८९ रुग्णांवर अजून उपचार सुरू असून ७७ हजार ५२५ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर, ३ हजार ३३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोगाने शनिवारी दिली.


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...