संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत ‘कोरोना’वरील चर्चेस चीनचा नकार 

कोरोना व्हायरसची लागण चीनमधूनच झाल्याचं संपूर्ण जगाला माहिती असताना, चीनने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत या विषयावर चर्चेस नकार दिला.
jinping
jinping

जिनिव्हा : कोरोना व्हायरसची लागण चीनमधूनच झाल्याचं संपूर्ण जगाला माहिती असताना, चीनने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत या विषयावर चर्चेस नकार दिला. सुरक्षा परिषदेत यावर चर्चा होणार होती. परंतु, चीनने त्याला असमर्थता दर्शवली आहे. मुळात चीनमधील कोरोनाच्या आकड्यांविषयी संशय व्यक्त केला जात आहे. तसेच चीन कोरोनाच्या मदतीने जागतिक आरोग्य बाजारपेठेत दबदबा निर्माण करत आहे, अशा अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यातच संयुक्त राष्ट्रांमध्ये चीनने चर्चा करण्यास असमर्थता दाखवल्यामुळं पुन्हा चीनला टीकेला सामोरं जावं लागणार आहे.  काय घडले सुरक्षा परिषदेत?  जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आतापर्यंत ५ लाख ३३ हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून, जवळपास २४ हजारहून अधिक नागरिकांचा यात बळी गेलाय. जवळपास संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये गेलंय. ज्या चीनमधून या कोरोना व्हायरसचा फैलाव झाला. त्या चीनमध्ये लागण झालेल्यांची संख्या कमी झाली आहे. चीन यातून सावरला. चीनने आता इतर देशांना मदत करायला सुरुवात केलीय. पण, चीन या विषयावर संयुक्त राष्ट्रांमध्ये बोलायला तयार नाही. त्यामुळं चीनविषयी शंका उपस्थित केली जात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत यावर चर्चा व्हावी, असा प्रस्ताव युरोपमधील इस्टोनिया या देशाने ठेवला होता. इस्टोनिया हा देश सुरक्षा परिषदेचा कायम सदस्य नाही. पण, या देशाने कोरोना संदर्भात पारदर्शकता असावी या उद्देशानं कोरोनावर चर्चेचा प्रस्ताव दिला होता. त्याला चीनने नकार दिला.  रशिया, अफ्रिकेचा चीनला पाठिंबा का?  कोरोना व्हायरस पसरण्यावर इस्टोनियाने चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पण, चीनने याविषयावर ‘सुरक्षा परिषदेत चर्चा करण्याचं कारण नाही, तसेच असा प्रस्ताव स्वीकारण्याची सक्तीही नाही,’ असं स्पष्ट केल. चीनला या विषयावर रशिया आणि दक्षिण अफ्रिकेने पाठिंबा दिला. रशिया आणि अफ्रिकेचे चीनशी चांगले व्यापार संबंध आहेत. या दोन्ही देशांनी चीनची बाजू घेताना, ‘जगाची सुरक्षा आणि शांतता याचा आणि व्हायरस पसरण्याचा कोणताही थेट संबंध नाही,’ असं म्हटल. त्यामुळं चीन आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी घेतलेल्या या स्पष्ट भूमिकेमुळे आता सुरक्षा परिषदेत कोरोना व्हायरसवर चर्चा होणार नाही. रशिया आणि अफ्रिकेच्या भूमिकेमागे चीनसोबतची त्यांची आर्थिक गणित असल्याच मानल जात. 

इतिहास काय सांगतो?  संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत केवळ जगाची शांतता आणि सुरक्षा यावरच चर्चा होते आणि रोगराईवर चर्चा होत नाही, असे नाही. यापूर्वी २०१४ मध्ये इबोला नावाचा व्हायरस जगात सगळीकडे पसरला होता. त्यावेळी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत त्यावर चर्चा झाली होती. त्यामुळं यावेळी कोरोना व्हायरसवरही परिषदेत चर्चा अपेक्षित होती. यासारखे संकट भविष्यात जगावर आल्यास काय होऊ शकते, यावरूही चर्चा होण्याची अपेक्षा होती. पण, चीनच्या भूमिकेनं ते अशक्य झाल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com