agriculture news in Marathi china restricted fertilizer export Maharashtra | Agrowon

चीनची खत निर्यातीवर बंदी 

टीम अॅग्रोवन
रविवार, 1 ऑगस्ट 2021

चीनमध्ये खतांचे घटलेले उत्पादन, विजेच्या जास्त वापरामुळे वाढलेला उत्पादन खर्च आणि वाढत्या निर्यातीमुळे देशांतर्गत दर वाढलेले आहेत. 

बीजिंग ः चीनमध्ये खतांचे घटलेले उत्पादन, विजेच्या जास्त वापरामुळे वाढलेला उत्पादन खर्च आणि वाढत्या निर्यातीमुळे देशांतर्गत दर वाढलेले आहेत. त्यामुळे देशात खतांची उपलब्धता वाढावी आणि दर नियंत्रणात यावे यासाठी चीन सरकारने खत निर्यातीवर निर्बंध आणले आहेत. येथील कंपन्यांनी आयातदार देशांना सरकारच्या निर्णयामुळे सध्या निर्यात शक्य नसल्याचे कळविले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

चीन जागतिक पातळीवर महत्त्वाचा खत उत्पादक देश आहे. चीनच्या राष्ट्रीय विकास आणि सुधारणा कमिशनने (एनडीआरसी) खत कंपन्यांना खताच्या साठेबाजी आणि सट्टेबाजीवर चर्चा करण्यासाठी नोटिसा पाठविल्या आहेत. परंतु खतांची साठेबाजी आणि सट्टेबाजी करणाऱ्या कंपन्यांची अद्यापपर्यंत ओळख करण्यात आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीनोफर्ट होल्डींग लि., सीनौग्री ग्रुप, चीन नॅशनल ऑफशोर ऑईल कॉ. आणि चीन नॅशनल कोल ग्रुप या सरकारी कंपन्यांनी खत निर्यात कमी केली आहे. काही कंपन्यांनी सरकारच्या निर्णयानंतर खत निर्यात तत्काळ थांबविली आहे. खत निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती कमी करण्यासाठी सरकारने विविध उपाय योजले आहेत. 

चीनमधून मोठ्या प्रमाणात होणारी निर्यात, कमी उत्पादन आणि वीजेचा जास्त खर्च यामुळे यंदा चीनमध्ये खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. चीनच्या मध्य हेनान प्रांतात पुरामुळे काही कंपन्यांची खत निर्यात घटली आहे. चीनच्या झेंग्झो कमोडिटी एक्सचेंजवर युरियाचे फ्युचर दर हे विक्रमी पातळीवर पोचले आहेत. गुरुवारी २ हजार ६१६ युआन प्रतिटनाने व्यवहार झाले. त्यात शुक्रवारी पुन्हा वाढ झाली. युरियाचे हजर बाजारात जुलैच्या सुरुवातीला २ हजार ८१४ युआन प्रतिटन दर होते. तेच जूनमध्ये २ हजार ६७४ युआन होते. 

चीन मोठा निर्यात 
जागतिक पातळीवर चीन हा महत्त्वाचा खत निर्यातदार आहे. २०२१ च्या पहिल्या सहा महिन्यांत चीनमधून ३२ लाख टन डीएपी (डायमोनियम फॉस्फेट) खताची निर्यात झाली आहे. या खताचे महत्त्वाची खरेदीदार भारत आणि पाकिस्तान आहेत. युरियाची भारत आणि पाकिस्तानमध्ये २४ लाख टन निर्यात झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

भारतीय कंपन्यांना संधी 
चीनी खत कंपन्यांनी निर्यात बंद केल्यास भारतीय खत कंपन्यांना निर्यातीत संधी वाढणार आहे. सर्वाधिक लाभ आरसीएफला होण्याची शक्यता आहे, कारण आरसीएफ निर्यातीत चीनी कंपन्यांशी स्पर्धा करते. चीनमधून देशातही आयात थांबणार असल्याने भारतीय खत कंपन्यांची विक्री वाढणार आहे. चंबळ, आरसीएफ आणि कोरोमंडल या कंपन्यांना लाभ होण्याची शक्यता आहे. 


इतर अॅग्रो विशेष
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभावपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत....
शेती, पर्यावरण संवर्धनातून वाघापूरची...पुणे जिल्ह्यात वाघापूर गावाने लोकसहभागातून आपले...
भाजपतर्फे एक नोव्हेंबरला काळ्या फिती...परभणी : मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टिग्रस्त...
नाशिक :कांदा व्यापाऱ्यांवर आयकर...नाशिक : जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी आघाडीवर...
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
अनिश्‍चित काळासाठी रस्ते अडविता येणार...नवी दिल्ली ः आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार...
निर्यात पडतळमुळे सोयाबीन दराला आधारपुणे : देशात सोयापेंडचे दर अधिक होते त्यामुळे...
राज्याच्या तापमानात चढ-उतारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर तापमानात...
हडपलेला शेतकरीवाटा जमा करण्यासाठी नोटिसापुणे ः राज्यात शेती अवजारे न वाटताच कोट्यवधी...
शेतकरी आंदोलक नव्या रणनीतीच्या तयारीतनवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांविरोधातील १०...
अॅपलबेरचे निर्यातक्षम उत्पादन. पुणे जिल्ह्यातील खानापूर (ता. जुन्नर) येथील...
सुयोग्य व्यवस्थापनातून हरभरा पिकात तयार...बुलडाणा जिल्ह्यातील सवडद येथील विनोद देशमुख यांनी...
विपरीत परिस्थितीत तग धरणाऱ्या...नागपूर ः दुष्काळी भागात नाचणी पीक तग धरू शकते....
दिवाळीनंतरच कृषी महाविद्यालये गजबजणारपुणे ः राज्यात कोविडमुळे बंद पडलेले कृषी...
यूपी सरकारची भूमिका वेळकाढूपणाचीनवी दिल्ली ः उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी येथील...
पावसाची उघडीप राहणारपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
हरभरा बियाणे वितरणासाठी कृषी विभागाची...पुणे ः राज्यातील रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र...
इथेनॉलनिर्मिती १५० कोटी लिटरच्या पुढे...पुणे ः राज्याची एकूण इथेनॉलनिर्मिती क्षमता येत्या...
‘सिबिल’वर ठरतेय कर्जदाराची पतसोलापूर : रिझर्व्ह बॅंकेच्या निकषांनुसार आता...