चंद्रावर कापसाला फुटले कोंब; चीनच्या प्रयोगाला यश

चंद्रावर कापसाला फुटले कोंब; चीनच्या प्रयोगाला यश
चंद्रावर कापसाला फुटले कोंब; चीनच्या प्रयोगाला यश

बीजिंग : चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत नाही, त्या भागात 'चांग इ-४' हे अवकाशयान चीनने काही दिवसांपूर्वी उतरविले. या यानातून नेलेले कापसाचे बी तेथे पेरले असून, त्याला कोंब फुटले आहेत. अशा पद्धतीने 'चांग इ-४' हे चंद्रावर कापूस पेरणारे पहिलेच यान ठरले आहे, अशी माहिती छोट्या स्वरूपात वातावरणनिर्मिती करणाऱ्या प्रयोगातील सहभागी शास्त्रज्ञांनी मंगळवारी दिली. 'चांग इ-४' ने ३ जानेवारीला चंद्राच्या पृष्ठभागावर स्पर्श केला. पृथ्वीवरून चंद्राचा जो भाग दिसत नाही, त्यावर यशस्वीरीत्या उतरल्यानंतर चंद्रावर छोट्या प्रमाणात वातावरणनिर्मिती करणारे हे पहिलेच यान ठरणार आहे. चंद्रावर वातावरणनिर्मिती करण्यासाठी 'चांग इ-४' यानाने कापूस, बटाटे, अबिडोप्ससिसच्या बिया, तसेच फळमाशीची अंडी व यिस्ट तेथे नेले आहे, असे वायव्य चीनमधील चॉंगक्विंग विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने सांगितले. 'चांग इ-४'ने पाठविलेल्या छायाचित्रांत कापसाला चांगले कोंब फुटले आहेत, तर इतर बियांची उगवण झाली नसल्याचे दिसत आहे. कापूस, बटाट्याची निवड भविष्य काळात अवकाशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी बटाटा हे मुख्य अन्न असणार आहे. कापसाचा वापर कापडासाठी होईल. कोबी व मोहरीच्या रोपाशी साधर्म्य असलेली छोटी फुले येणारी अबिडोप्ससिस ही वनस्पती अल्प काळात उगवते अन्‌ त्याचे निरीक्षण करणे सोपे असते. लघू वातावरणनिर्मितीत ऑक्‍सिजन व कार्बन डायऑक्‍साइडचे नियमन करण्यात यिस्टचा महत्त्वाचा भाग आहे. फळमाशी ही प्रकाश संश्‍लेषण प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहे, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. ...अशी केली उगवण चंद्रावर बिया पेरण्यासाठी चीनने दंडगोल आकारातील खास ॲल्युनिमियमची नलिका तयार केली आहे. याची उंची १९८ मिलिमीटर असून, व्यास १७३ मि.मी. आहे वजन २.६ किलो आहे. या भांड्यात पाणी, माती, हवा, दोन लहान कॅमेरे व उष्णता नियंत्रण व्यवस्था आहे. यान चंद्रावर उतल्यानंतर पृथ्वीवरील नियंत्रण चंद्राने बियांची उगवण होण्यासाठी पाणी देण्याची सूचना केली होती. त्याला नैसर्गिक प्रकाश देण्याची सोयही करण्यात आली आहे. चंद्रावर कापूस उगविण्याच्या या प्रयोगातून आम्ही भविष्यात अवकाशातील अस्तित्वासाठी दिशा दाखविली आहे. कमी गुरुत्वाकर्षणाच्या वातावरणात पिकाच्या वाढीच्या अभ्यासातून भविष्यात अवकाशात वसाहतीच्या दृष्टीने पायाभरणी केली आहे. - प्रा. शिये जेनशिन, प्रयोगाचे मुख्य विकसक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com