चीन केळी उत्पादनात पडला मागे

चीन केळी उत्पादनात पडला मागे : चीनच्या संशोधकांची कबुली
चीन केळी उत्पादनात पडला मागे : चीनच्या संशोधकांची कबुली

जळगाव : चीनमधून पिकवून खाण्यायोग्य अनेक केळी वाणांचा प्रसार झाला; परंतु आज चीन केळी उत्पादनात मागे पडला आहे. चीनला केळीची आयात करावी लागते, अशी कबुली चीनच्या हेईनन कृषी विद्यापीठातील कृषी शास्त्रज्ञांनी दिली. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत येथील केळी संशोधन केंद्राला चीन येथील कृषी शास्त्रज्ञांनी गुरुवारी (ता. ११) भेट दिली. इशीजे, फेईयंग, युएज, झुओमीन झांग यांचा त्यामध्ये समावेश होता. त्यांच्यासोबत जागतिक केळीतज्ज्ञ के. बी. पाटील उपस्थित होते. केळी संशोधन केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ प्रा. नाझेमोद्दीन शेख यांनी या शास्त्रज्ञांशी चर्चा केली. केंद्रात संशोधन झालेल्या फुले प्राईड केळी वाणाच्या बागेची त्यांच्यासोबत पाहणी करण्यात आली.

महाराष्ट्रात प्रतिकूल स्थितीत, अतिउष्ण कोरड्या वातावरणातही केळीचे दर्जेदार, उत्तम उत्पादन घेतले जाते. याबाबत या शास्त्रज्ञांनी आनंद व्यक्त केला. भारतात जळगाव जिल्ह्याची केळी उत्पादकता अधिक आहे. केळीला उष्ण व दमट वातावरण हवे असते. पण, जळगाव जिल्ह्यात अतिउष्ण व कोरड्या अशा प्रतिकूल स्थितीत केळीचे दर्जेदार उत्पादन घेतले जात असल्याचे प्रा. शेख यांनी या शास्त्रज्ञांना सांगितले. 

चीनमध्ये थंडीचे संकट आपण अभ्यास दौऱ्यावर आलाे आहोत. फळे व भाजीपाला पिके, त्यांचे अर्थशास्त्र यांची माहिती घेत असल्याचे या शास्त्रज्ञांनी सांगितले. चीनमध्ये तीन लाख हेक्‍टरवर केळी असते. तेथून केळीच्या अनेक वाणांचा प्रसार झाला. पण, चीनमध्ये थंडी अधिक असते. त्यामुळे केळीचे मोठे नुकसान होते, असेही त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com