Agriculture news in marathi, Chincholi first in Barshi taluka in water cup competition | Agrowon

वॉटर कप स्पर्धेत चिंचोली बार्शी तालुक्यात प्रथम
टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे. गावाचा शाश्वत विकास करण्यासाठी आपल्याला अजून खूप पल्ला गाठायचा आहे. भविष्यातील सर्व प्रयत्नांसाठी समान ऐक्य, समर्पण आणि दृढ निश्‍चय करून गावाचा सर्वांगीण विकास साधू.
- डी. टी. शिंदे (ग्रामस्थ, चिंचोली)
 

पांगरी  : सत्यमेव जयते वॉटर कप २०१९ मध्ये सहभागी झालेल्या चिंचोली (ता. बार्शी) गावाने तालुकास्तरीय पाणी फांउडेशन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकाविले. दहा लाख रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेऊन गावासाठी मिळालेले हे पाहिलेच मोठे बक्षीस ठरले आहे.

गावकऱ्यांनी ५० दिवस श्रमदानातून गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न केले. पुणे येथील बालेवाडी शिवछत्रपती क्रीडा संकुलात पाणी फांउडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांच्या हस्ते ग्रामस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनतर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

या स्पर्धेसाठी फांउडेशनचे जिल्हा समन्वयक अधिक जगदाळे, तालुका समन्वयक नितीन आतकरे, मेघा शिंदे, नेहा आतगुडे, सुयश शिंदे, स्नेहल वाघमोडे, कोमल जगताप, सतीश लोटेकर आदींच्या टीमने वेळोवेळी भेट देऊन मार्गदर्शन केले. या वेळी पोलिस अधीक्षक डी. टी. शिंदे, डॉ. सुधीर शिंदे, उद्योजक संतोष शिंदे, माजी नगरसेवक शिवाजी पाडूळे, श्रीहरी शिंदे, धनंजय शिंदे, बाबासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

इतर बातम्या
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
मांजरपाड्याचे पाणी दरसवाडी धरणात पोचलेनाशिक : येवल्याच्या दुष्काळी भागात पाणी...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...